प्रसिद्ध अभिनेत्री एलन पेज हिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारले आहे. तिने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आता माझं नाव अॅलन नसून एलियॉट पेज आहे. तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. अशा आशयाची पोस्ट लिहून तिने एकच खळबळ उडवली आहे.
एलन पेज ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजवर एक्स मेन, इन टू द फॉरेस्ट, इन्सेप्शन, जुनो यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. अष्टपैलू अभिनय शैलीमुळे तिने हॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:च असं एक वेगळ स्थान प्रस्थापित केलं आहे. परंतु एलन आता यापुढे अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार नाही. कारण तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारलं आहे.
— Elliot Page (@TheElliotPage) December 1, 2020
“लहानपणापासून मला पुरुषांपेक्षा स्त्रियांप्रती जास्त आकर्षण होतं. त्यामुळे मी ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी माझ्यावर टीका देखील केली. तुम्ही मला पुरुष म्हणा अथवा स्त्री मला काही फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. लक्षात ठेवा आता माझं नाव एलन नसून एलियॉट पेज आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहून एलियॉटने आपल्या भावना व्यक्त केल्या. एलन गेली तीन वर्ष एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलिकडेच तिने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असं तिनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर तिने ही शस्त्रक्रिया एमासाठीच केली अशी चर्चा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2020 12:41 pm