News Flash

इम्रान-कंगनाचे ‘पाकिजा’ गाणे

कंगना राणावत आणि इम्रान हाश्मी हे दोघे पुन्हा एकदा ‘उंगली’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. यात काही विशेष नाही.

| November 9, 2014 05:22 am

कंगना राणावत आणि इम्रान हाश्मी हे दोघे पुन्हा एकदा ‘उंगली’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. यात काही विशेष नाही. परंतु, त्या दोघांवर ‘पाकिजा’ या जुन्या हिंदी सिनेमातील हिरो-हिरोईनच्या रोमान्स पद्धतीने चित्रित करण्यात आलेले गाणे गाजणार का, याबद्दल मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
हल्ली चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी एकेक गाणे यूटय़ूबवर अपलोड करून उत्सुकता निर्माण करण्याचा ‘फंडा’ वापरला जातोय. धर्मा प्रॉडक्शन्सच्या रेन्सिल डिसिल्वा दिग्दर्शित ‘उंगली’ या आगामी चित्रपटातील पाकिजा असे बोल असलेले गाणे प्रकाशित करण्यात आले आहे. ‘सीरियल कीसर’ ही आपली प्रतिमा वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बदलून टाकण्याचा चंग इम्रान हाश्मीने बांधला असावा. म्हणूनच की काय जुन्या हिंदी चित्रपटांमधील प्रमुख कलावंत जोडीचे रोमॅण्टिक गाणे चित्रित केले जायचे त्या पद्धतीने रेन्सिल डिसिल्वाने ‘पाकिजा’ हे गाणे कंगना-इमरान यांच्यावर चित्रित केले आहे.
पाकिजा हे रोमॅण्टिक गाणे कंगना राणावत-इम्रान हाश्मी यांच्यावर चित्रित करण्यात आले असून यापूर्वी ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘तू ही मेरी’ आणि ‘राझ २’मधील ‘माही’ ही दोन गाणी कंगना-इमरान यांच्यावर चित्रित झाली होती आणि ती प्रचंड गाजलीही होती. त्यामुळे करण जोहरने आपला आगामी चित्रपट लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने मार्केटिंग खेळी करीत ‘पाकिजा’ हे गाणे आणले आहे, अशी चर्चा रंगली आहे. कंगना-इम्रान ही जोडी प्रेक्षकांना आवडणार का, हा खरा सवाल आहे. याचे उत्तर प्रेक्षकांनी ‘पाकिजा’ हे गाणे पाहून द्यावे म्हणजे ट्रेलर पाहून सिनेमाला जाण्याचे ठरविणाऱ्या प्रेक्षकांना एवढे एकच गाणे दाखवून ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत उत्सुकता ताणायची हा मार्केटिंग फंडा धर्मा प्रॉडक्शन्सने वापरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2014 5:22 am

Web Title: emraan hashmi and kangana ranaut in pakeezah song
Next Stories
1 ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सव
2 ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या टीमकडून ‘विटी दांडू’चे व्हीएफएक्स
3 जया बच्चन यांच्या विधानावरून इतरांचीच सारवासारव
Just Now!
X