इमरान हाश्मीचा लवकरच बादशाहो हा सिनेमा येणार आहे. या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे या सिनेमात इमरान बेबी डॉल सनी लियॉनी बरोबर एक आयटम साँग करणार आहे. या सिनेमात दोघंही एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. या गाण्याचे शुटिंग मुंबई किंवा राजस्थानमध्ये होणार आहे.
इमरान म्हणाला की, सनीचे आतापर्यंतचे सगळीच गाणी गाजली आहेत. ज्या गाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत ते गाणेही चांगलेच आहे. शिवाय ज्याप्रकारे हे गाणे कोरिओग्राफ केले आहे त्यावर हे गाणे हिटच होणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
बादशाहोचं दिग्दर्शन मिलन लुथारिया करणार आहेत. या सिनेमात इमरान हाश्मी बरोबर अजय देवगण याचीही मुख्य भूमिका आहे. बादशाहोआधी हे दोन्ही कलाकार वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या सिनेमासाठी एकत्र आले होते. हा सिनेमा पुढच्या वर्षी १० मार्चला प्रदर्शित होणार आहे. बादशाहो सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असा विश्वास सिनेमाशी निगडीत कलाकारांना वाटत आहे.
सध्या इमरान हाश्मी ‘राज’ या भयपटाचा पुढचा भाग ‘राज रिबूट’ या सिनेमात दिसणार आहे. इमरान हाश्मीची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. यावेळी इमरान हाश्मी बरोबर दाक्षिणात्य सिनेमांची अभिनेत्री कृती खरबमदाही दिसणार आहे. तर ‘लव्ह गेम्स’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलेला अभिनेता गौरव अरोडाचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भयपट बनवण्यात हातखंडा असलेले विक्रम भट यांच्या दिग्दर्शनामध्ये हा सिनेमा बनवण्यात आला आहे. ‘अझर’ या सिनेमानंतर इमरान हाश्मी ‘राज रीबूट’मध्ये त्याच्या चाहत्यांना घाबरवण्यात यशस्वी होतो की नाही ते १६ सप्टेंबरला कळेलच.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2016 5:47 pm