बॉलिवूड वर्तुळात गेले कित्येक दिवस घराणेशाहीचा मुद्दा जोर धरून आहे. बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे की नाही यावर आता दोन गट पडले आहेत. त्यातले अधिकतर हे घराणेशाही नसल्याचे समर्थन देतात. पण आता खुद्द इमरान हाश्मीने हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही असल्याचे मान्य केलेय.

शाहरुखने फ्रेंडशिप डेच्या दिवशी असा पाळला आमिरचा शब्द

एका मुलाखती दरम्यान त्याला घराणेशाहीचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा इमरान म्हणाला की, ‘हो हे खरंय. मला फक्त याच कारणामुळे ब्रेक मिळाला. जर माझे काका महेश भट्ट, जे स्वतः निर्माते आणि दिग्दर्शक आहेत ते जर माझ्या पाठिशी नसते तर मी आज अभिनेता झालो नसतो. माझ्याबाबतीत थोड्या गोष्टी वेगळ्या होत्या. एक अभिनेता व्हावं अशी माझी फारशी इच्छा नव्हती. पण तरीही माझं कॉलेज झाल्यावर मी सरळ सिनेमांची वाट धरली.’

आपल्या मुलाबद्दल बोलताना इमरान म्हणाला की, ‘मी माझ्या सात वर्षांच्या मुलावर अयानवर सिनेसृष्टीत येण्यासाठी कधीच जबरदस्ती करणार नाही. पण जर तो म्हणाला की त्याला सिनेसृष्टीत यायचं आहे तर त्याच्यासाठी तिथपर्यंत येण्याचा रस्ता कठीण नसेल. कारण त्याचे बाबा स्वतः एक अभिनेता आणि निर्माता आहे. माझी जी ओळख आहे त्यापद्धतीची ओळख सिनेसृष्टी माझ्या मुलामध्येही शोधेल. त्याला एक नवोदित कलाकार म्हणून कधीच पाहिलं जाणार नाही.’

ही आहेत बॉलिवूडमधील रक्षाबंधनची सदाबहार गाणी

सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरुन अनेक वादंग उठत आहेत. या सगळ्याची सुरूवात करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणौतमुळे झाली. कंगनाने करणला घराणेशाहीचा पुरस्कर्ता असं म्हटलं होतं.