स्वयंसेवी संस्था आणि यंत्रणांची संयुक्त कामगिरी

मुंबई : ‘बार्क ’ आणि नेल्सन यांच्या नव्या एकत्रित अहवालानुसार टाळेबंदीचा मोठा फटका मनोरंजन वाहिन्यांच्या प्राइम टाइमला बसला आहे. प्राइम टाइमच्या एकू ण प्रेक्षकसंख्येत १५ टक्क्यामनी घट झाली असून त्या तुलनेत नॉन प्राइम टाइम म्हणजेच दिवसभरातील प्रेक्षकसंख्या सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के  इतकी आहे. प्राइम टाइमच्या प्रेक्षकसंख्येतील घसरण थांबवण्यासाठी वाहिन्यांनी कं बर कसली असून त्यासाठी गाजलेल्या लोकप्रिय मालिका प्राइम टाइममध्ये दाखवण्याचा निर्णय वाहिन्यांनी घेतला आहे.

टाळेबंदीच्या काळात मनोरंजन वाहिन्यांपेक्षा वृत्तवाहिन्या, लहान मुलांच्या वाहिन्या आणि चित्रपट वाहिन्या यांची प्रेक्षकसंख्या वाढली आहे. गेल्या आठवडय़ात मनोरंजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत के वळ एक टक्का वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र ही वाढ दिवसभरातील प्रेक्षकसंख्येत झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मालिकांचे चित्रीकरणच थांबल्यामुळे जुनेच भाग दाखवण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय, टाळेबंदी जाहीर झाल्यानंतरचा तो पहिलाच आठवडा असल्याने आम्हीही प्रेक्षकांचा अंदाज घेत होतो. दिवसभरात सकाळपासूनच लोक घरी असल्याने सकाळच्या वेळेत बातम्या पाहण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. याचा परिणाम संध्याकाळच्या प्रेक्षकसंख्येवर निश्चितपणे झाला आहे, अशी माहिती कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी दिली. सध्या जुन्या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे कलर्स मराठीवरही प्राइम टाइममध्ये ‘बिग बॉस २’ पुन्हा प्रक्षेपित करण्यात येणार आहे, ‘आवाज’ ही आणखी एक जुनी मालिकाही नव्याने दाखवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘झी मराठी’वरही  ‘चला हवा येऊ द्या’चे गाजलेले भाग प्राइम टाइममध्ये दाखवले जात आहेत.

बार्कच्या अहवालानुसार जुन्या मालिकांमध्ये सध्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्या ‘रामायण’ मालिके ला आहे. २०१५ पासून आजपावेतो प्रदर्शित झालेल्या कोणत्याही मालिके पेक्षा रामायणचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे, असे बार्क ने स्पष्ट के ले आहे. जुन्या मालिकांना मिळणारा हा वाढता प्रतिसाद लक्षात घेत निर्माती एकता कपूरनेही ‘कु मकु म भाग्य’ आणि ‘कुं डली भाग्य’ या दोन प्राइम टाइम मालिकांचे जुनेच भाग पुन:प्रक्षेपित करणे थांबवले असून त्याऐवजी तिने आपल्या निर्मितीसंस्थेची ‘कर ले तू भी मोहोब्बत’ ही गाजलेली मालिका झी टीव्हीवर आणली आहे. पाठोपाठ ‘कहने को हमसफर है’ आणि ‘बारीश’ या आणखी दोन जुन्या लोकप्रिय मालिका झी टीव्हीवर प्राइम टाइममध्ये दाखवल्या जात आहेत. प्राइम टाइमच्या या घसरत्या प्रेक्षकसंख्येची मदार आता या जुन्या लोकप्रिय मालिकांवर असणार आहे.