News Flash

पुन्हा एकदा एकत्र येणार अंकिता -सुशांत ?

याच इच्छेखातर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्याचं समोर येतं आहे.

पुन्हा एकदा एकत्र येणार अंकिता -सुशांत ?

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा ब्रेकअप झाल्यानंतर या जोडीने आपआपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळालं. विभक्त झाल्यानंतर या दोघांनीही एकमेकांपासून दूर राहणं पसंत केलं. मात्र ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावी अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांची होती. याच इच्छेखातर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्याचं समोर येतं आहे.

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारा सुशांत सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. तर अंकितादेखील ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे ही जोडी पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी टीव्ही या वाहिनीवरील ‘जोधा अकबर’ आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिका पुन्हा एकदा ऑनएअर दाखविल्या जाणार आहेत. या मालिकांनी निरोप घेतल्यानंतर त्या पुन्हा दाखविल्या जाव्यात अशी इच्छा प्रेक्षकांची होती. त्यामुळे या मालिका पुन्हा दाखविल्या जाणार आहेत. ३ सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी संध्याकाळी ४ आणि ५ या वेळामध्ये त्या प्रसारित होतील, असं झी टीव्हीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, झी टीव्हीने इन्स्टाग्रामवर या विषयी पोस्ट केली असून प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरु करत असल्याचं म्हटलं आहे. २००९ साली सुरु झालेल्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व निर्माण केलं होतं. तर ‘जोधा अकबर’ या मालिकेनेही प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 12:16 pm

Web Title: ex lovers sushant singh rajput and ankita lokhande will be back in pavitrarishta
Next Stories
1 Video : ‘बॉईज २’ चा टीझर पाहिलात का ?
2 ‘केदारनाथ’च्या अडचणीत वाढ , दिग्दर्शक-निर्मात्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
3 चित्र रंजन : योग्य वेळी योग्य विषय
Just Now!
X