अगदी गेल्याच आठवडय़ात टाळेबंदीची कुणकुण लागताच छोटय़ा-मोठया चित्रपट निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले. यातले काही चित्रपट हळूहळू ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यताही वाढीस लागली आहे. अशा संकटकाळात चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय अवघड असला तरी घेणे गरजेचे आहे हे समजून उमजून हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी यावर फार भाष्य करणे टाळले आहे. मात्र याही परिस्थितीत कं गना राणावत शांत राहणे शक्यच नव्हते. कं गनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता आणि तमिळ, हिंदी, तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट ठरल्याप्रमाणे किमान दक्षिणेत तरी प्रदर्शित होईल असा अंदाज होता. त्यामुळेच की काय बॉलीवूडचे सगळे कलाकार लपून बसले तरी थलायवी येणारच अशी दर्पोक्ती कं गनाने के ली होती. पण इतरांप्रमाणेच सध्या देशभरातील करोना संसर्गाचा वेग पाहता चित्रपट पुढेच ढकलणे योग्य असल्याचा निर्णय निर्मात्यांनी जाहीर के ला आहे.

तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘थलायवी’ या चित्रपटात कं गनाने जयललिता यांची भूमिको के ली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि जयललितांच्या भूमिके त दिसलेल्या कंगनाचे कौतूकही सगळीकडे झाले. चित्रपटाची प्रसिध्दीही चांगली झाली आहे. या जमेच्या बाजू लक्षात घेता चित्रपट प्रदर्शित करण्याची आमची पूर्ण तयारी होती, असे निर्मात्यांनी जाहीर के लेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत पुन्हा एकदा देशभरात काही ठिकाणी चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी चित्रपटगृहे सर्व नियम पाळून पन्नास टक्के  क्षमतेत चालवण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीती सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगत निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले असल्याचे जाहीर के ले आहे. निर्मात्यांनी आपला निर्णय जाहीर के ल्यानंतर कं गनाने त्यावर समाजमाध्यमांवरून फारसे भाष्य के लेले नाही. ‘चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली तरच हा व्यवसाय उभारी घेईल’, असे कं गनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे थलायवीची गर्जना फु काचीच ठरली म्हणायचे..

पण हा निर्णय जाहीर होण्याआधीच कं गनाने आपल्या ट्रेलरवर झालेल्या कौतूकवर्षांवाचा आधार घेत बॉलीवूडजनांना सुनावण्याची संधी सोडलेली नाही. ‘थलायवी’च्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र आता माझ्या कामाचे जाहीर कौतूक करणेही अनेकांना अडचणीत आणणारे ठरते आहे, असा टोमणा तिने मारला आहे. दीपिका आणि अलियाच्या चित्रपटांचे जाहीर समाजमाध्यमांवरून कौतूक के ले जाते, मात्र मला वैयक्तिक संदेश दिले जातात असे सांगत अगदी अक्षय कु मारनेही आपले कौतूक के ले आहे (मात्र लपूनछपून), असा थेट टोला तिने लगावला आहे. अर्थात यावर नेहमीप्रमाणे कोणीही व्यक्त होणार नाही हेही खरे.. मात्र खुद्द कं गनावरही या परिस्थितीमुळे इतर कलाकारांप्रमाणेच शांत बसून राहण्याची नामुष्की ओढवली आहे हे त्या मौन साधणाऱ्या सूज्ञांच्या मनातही डोकावले असणारच!