24 September 2020

News Flash

‘ओटीटी आणि चित्रपटगृहे दोन्हींचे अस्तित्व महत्वाचे’

विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा बहुचर्चित चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांचे मोठे चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे ओटीटी चित्रपटगृहांपेक्षा वरचढ ठरणार की काय?, अशी शंका एकीक डे व्यक्त होते आहे. तर दुसरीकडे चित्रपटगृहे विरुद्ध ओटीटी असा वादही सुरू झाला आहे. मात्र ओटीटी प्लॅटफॉम्र्समुळे चित्रपटकर्मीना वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची संधी मिळते आहे, असे सांगतानाच चित्रपटगृहांचे अस्तित्वही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत अभिनेत्री विद्या बालनने व्यक्त के ले.

विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा बहुचर्चित चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध गणितज्ञ आणि मानवी संगणक  म्हणून ओळखल्या गेलेल्या शकुंतला देवी यांच्या भूमिकेसाठी विद्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर आलेल्या विद्या बालनच्या मते करोनाकाळात ओटीटी प्लॅटफॉम्र्स खूप महत्त्वाचे ठरत आहेत. फक्त ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर प्रदर्शित करता येईल अशी खास आशयनिर्मिती होताना येत्या काळात दिसून येईल. या प्लॅटफॉम्र्सवर आशय-मांडणीच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य चित्रपटकर्मीना मिळत असल्याने साहजिकच या माध्यमांकडे त्यांचा कल वाढतो आहे, असे तिने सांगितले. मात्र चित्रपट हा सगळ्यांबरोबर एकत्रच पाहिला गेला पाहिजे. त्याची जादू वेगळी असल्याने चित्रपटगृहेही कायम कार्यरत असतील, अशी भावना तिने व्यक्त के ली. ‘मिशन मंगल’ या चित्रपटापाठोपाठ पुन्हा एकदा तितक्याच सशक्त आणि वेगळ्या चरित्रभूमिके तून विद्या प्रेक्षकांसमोर आली आहे. हिंदी चित्रपटात सध्या नायिकांच्या भूमिकेत खूप चांगले आणि सकारात्मक बदल होत आहेत आणि अर्थातच हा बदल कलाकार म्हणून सुखावणारा असल्याचे ती सांगते. आधी शास्त्रज्ञ आणि आता गणितज्ञ अशा शैक्षणिकदृष्टया प्रगत भूमिका के ल्याने इतर कोणी नाही पण आपले आईवडील खूप सुखावले आहेत, असेही ती गमतीने सांगते.

‘शकु ंतला देवी’ हा के वळ चरित्रपट नाही. त्यापलीकडे जात एक स्वतंत्र विचाराची, कणखर व्यक्तिमत्त्व असलेली आणि काळाच्या खूप पुढचा विचार करणारी स्त्री या चित्रपटात दिसते. शकु ंतला देवींचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत साधे-सरळ असे नव्हते. एखादे गुंतागुंतीचे समीकरण असावे असे व्यक्तिमत्त्व असलेल्या शकुंतला देवींना मुळातच स्त्री-पुरुष हा भेदभावच मान्य नव्हता. त्यांनी स्वत:ला स्त्री म्हणून कधी वेगळ्या दृष्टीने पाहिलंच नव्हतं. त्यामुळे त्यांची विचारसरणी आणि त्या काळातील स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा दृष्टिकोन या सगळ्याचा विचार करत चित्रपटाची मांडणी करण्यात आली असल्याचे विद्याने स्पष्ट के ले. शकुंतला देवी यांचे एकं दरीत व्यक्तिमत्वच भारावून टाकणारे आहे. त्यांच्याबद्दल दिग्दर्शिका अनू मेनन यांच्याकडून ऐकत असताना के वळ त्या गणितज्ञ म्हणून खूप मोठय़ा होत्या म्हणून नाही. तर एक व्यक्ती म्हणून त्या फार वेगळ्या होत्या. सळसळता उत्साह, सतत ऊर्जेने भारलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची विनोदबुद्धी या सगळ्या गोष्टी प्रभावित करणाऱ्या होत्या, असं विद्या सांगते. मुळात शकुंतला देवी स्वत: एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच आयुष्यभर जगल्या. स्त्री आणि पुरुष असे व्यक्तीचे दोन वेगळे अंग आहेत हे त्यांनी कधीच मान्य के लं नाही. त्यामुळे एक व्यक्ती जे जे मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगते ते ते सगळं त्यांना हवं होतं, पण समाजाच्या दृष्टीने त्या एक स्त्री होत्या आणि स्त्रियांना सगळंच मनासारखं मिळवता येत नाही. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तो वाद कायम राहिला. आणि हे सगळं चित्रपटात जसंच्या तसं मांडता आलं याबद्दल तिने समाधान व्यक्त के लं.

एक कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत  नायक-नायिका हे अंतर कमी होतं आहे. नायिकांकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं जातं आहे. चित्रपटातील पुरुष कलाकाराची नायिका म्हणून तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता राहिलेला नाही. यामुळे खूप वेगवेगळया भूमिका कलाकारांच्या वाटय़ाला येत आहे. हे चित्र आनंददायी आहे.

विद्या बालन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 1:32 am

Web Title: existence of ott platforms and movie theaters is important vidya balan zws 70
Next Stories
1 नावातच सारे आहे!
2 ज्येष्ठांचा  पुन : प्रवेश
3 ‘चांगल्या भूमिका लिहिल्या जाणं हा अनुभव दुर्मीळच’
Just Now!
X