टाळेबंदीत समाजमाध्यमे, ओटीटी आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉम्र्सवरून गाणी ऐकण्याचे, लोकप्रिय गाण्यांवर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे, लाईव्ह संगीत कार्यक्रम करण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यकाळात या माध्यमांमधून गाण्यांचा मोठय़ा प्रमाणावर होणारा वापर लक्षात घेत आपल्या प्लॅटफॉर्मवर ही गाणी कायदेशीररित्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फेसबुकने ‘इंडियन परफॉर्मिग राईट्स सोसायटी’ या संस्थेशी करार के ला आहे. या करारामुळे आयपीआरएसचे सदस्य असलेल्या गीतकार-संगीतकारांनाही त्यांच्या फे सबुकवरील गाण्यांसाठी रॉयल्टी मिळणार आहे.

फेसबुकने याआधी ‘सारेगम’ कं पनीशी त्यांच्या गाण्यांसाठी करार केला. आता ‘आयपीआरएस’चे सदस्य असलेल्या गीतकार-संगीतकारांची गाणीही कायदेशीररित्या आपल्या ग्राहकांना उपलब्ध व्हावीत, यासाठी फे सबुकने करार के ला असल्याची माहिती आयपीआरएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राके श निगम यांनी दिली. आपल्याकडे गाणी लोकप्रिय झाली की त्या गाण्याचे गायक-गायिका लोकांच्या लक्षात येतात, मात्र या गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार यांना ओळखही मिळत नाही. आणि गाण्यासाठीची रॉयल्टीही मिळत नाही. आयपीआरएस ही प्रामुख्याने गीतकार आणि संगीतकारांना रॉयल्टी मिळवून देण्याचे काम करते. या संस्थेंतर्गत असलेल्या गीतकार-संगीतकार यांची  गाणी फे सबुक, इन्स्टाग्रामसह फे सबुकच्या ‘इन्स्टाग्राम रील्स’ या आगामी अ‍ॅपवरही वापरली जाणार असून त्यासाठीची रॉयल्टीही त्यांना मिळणार असल्याचे निगम यांनी स्पष्ट के ले. आयपीआरएस के वळ हिंदी नाही तर मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा प्रादेशिक भाषेतील गाण्यांसाठीही काम करत असल्याने या कराराचा फायदा प्रादेशिक गीतकार-संगीतकारांनाही मिळणार आहे. सर्वसाधारणपणे रॉयल्टीची रक्कम गाण्याचे प्रकाशक, गीतकार आणि संगीतकार यांच्यात वाटली जाते. प्रकाशकांना रॉयल्टीतील ५० टक्के  आणि गीतकार-संगीतकाराला प्रत्येकी २५ टक्के  हिस्सा मिळतो. फे सबुकशी झालेल्या करारामुळे गीतकार-संगीतकारांनाही रॉयल्टीची रक्कम मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट के ले.