25 September 2020

News Flash

‘रिलेशनशिप स्टेटस’ विचारणाऱ्या चाहत्याला इलियानाचं भन्नाट उत्तर

इलियानाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना दिली प्रश्न विचारण्याची संधी

इलियाना डिक्रूझ

बॉलिवूडमध्ये हातावर मोजण्यात येतील असे कलाकार आहेत जे कधीच आपलं प्रेमसंबंध इतरांपासून लपवत नाहीत. त्यातच अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिचा समावेश होतो. आम्ही फार चांगले मित्र आहोत असे इतरांसारखे नेहमीचीच वाक्य ती सांगत नाही. इलियाना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्र्यू नीबोनचे फोटो नेहमीच शेअर करत असते. जवळपास गेल्या दहा वर्षांपासून हे दोघं एकत्र असून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र या दोघांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होत्या. इलियानाने नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी तिने दिली होती. त्यात एकाने तिला तिचं रिलेशनशिप स्टेटस विचारलं. यावर इलियानाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘तू सिंगल आहेस की रिलेशनशिपमध्ये आहेस’, असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला. त्यावर तिने स्वत:चा फोटो पोस्ट केला आणि त्यावर मांजरीचा एडिट केलेला फोटो शेअर करत लिहिलं, ‘आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसत आहोत असं नाही वाटत का?’

आणखी वाचा : सुशांतची ५० अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करणारी संजना आहे तरी कोण? 

इलियाना आणि अँड्र्यूचा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ब्रेकअप झाल्याचं कळतंय. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. इतकंच नव्हे तर इलियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील अँड्र्यूसोबतचे सर्व फोटो डिलीटसुद्धा केले. इलियानाने तिच्या बऱ्याच सोशल मीडियावरील पोस्टवर अँड्र्यूचा उल्लेख ‘हबी’ (पती) असा केला होता. त्यामुळे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:34 pm

Web Title: fan asks ileana dcruz if she is single or in a relationship here is her sassy reply ssv 92
Next Stories
1 “…तेव्हा आत्महत्येचाही विचार डोक्यात आला”; करोनाबाधित अभिनेत्रीने सांगितला अनुभव
2 ‘जय हिंद जय भारत’ म्हणत टिक-टॉक स्टार अभिनेत्याने डिलिट केले चिनी अ‍ॅप
3 Video : अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X