News Flash

‘गोल्ड’मुळे अक्षयच्या लोकप्रियतेत तुफान वाढ, असं केलं चाहत्यांनी प्रेम व्यक्त

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यासाठी त्यांचे चाहते काहीही करु शकतात.

अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेला ‘गोल्ड’ हा चित्रपट आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हॉकी या खेळावर आधारित ‘गोल्ड’ या चित्रपटामध्ये अक्षयकुमारने तपन दास यांची भूमिका वठविली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून अक्षयकुमारच्या फॅनफॉलोअर्समध्येही वाढ होत आहे. विशेष म्हणजे ‘गोल्ड’ आज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रदर्शित झाल्यामुळे अक्षयच्या एका चाहत्याने एका आगळ्यावेगळ्या स्वरुपामध्ये या चित्रपटाचं स्वागत केलं आहे.

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यासाठी त्यांचे चाहते काहीही करु शकतात. त्यातलंच एक नाव म्हणजे खिलाडी कुमार. अक्षयचा फॅनफॉलोअर किती आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र या चाहत्यांपैकी एक चाहता प्रचंड निराळा असून त्याने ‘गोल्ड’च्या यशासाठी दिलेल्या शुभेच्छा पाहून अक्षयही अचंबित होईल.

‘गोल्ड’मधील अक्षयची भूमिका पाहून त्याच्या चाहत्यांनी केक कापून  त्याच अभिनंदन केलं तर सोलापूरातील एका चाहत्याने अक्षयच्या फोटोचा कटआऊट काढून त्यावर फुलांच्या माळा चढविल्या आहेत. तर काहींनी ‘गोल्ड’ चित्रपटाच्या फोटोची प्रिंट असलेला टी शर्ट घातला आहे.

दरम्यान, गोल्ड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच तो लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये अक्षयकुमार प्रमुख भूमिकेमध्ये असून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय हीने पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 3:04 pm

Web Title: fans of akshay kumar celebrates gold release by cake cutting
Next Stories
1 Manto trailer: ‘गुलाम थे तो आजादी का ख्वाब देखते थे, और अब आजाद हुए तो….’
2 माझ्यात आणि कतरिनामध्ये सारं काही अलबेल -आलिया
3 Bharat teaser : ‘कुछ रिश्ते जमीन से होते है’, सलमानच्या ‘भारत’ची झलक पाहिलीत का?
Just Now!
X