दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे प्रेमसंबंध आता कोणापासून लपून राहिलेले नाहीत. या दोघांनी त्यांच्या नात्याचा कधी स्वीकार केला नसला तरी त्यांनी हे नाते नाकारलेही नाही. एकमेकांसाठी ते नेहमीच ‘खास’ होते. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून दिपिका सध्या बंगळुरूमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर थोडा वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या कुटुंबीयांसमवेत लंडनला सुटीचा आनंद लुटायला गेली असताना रणवीरही तिथे एका कामानिमित्त गेला होता.
बंगळुरूमध्ये दीपिका तिची बहिण अनिशा आणि इतर मित्र-मैत्रिणींसह एका कॉमेडी शोला गेली होती. यावेळी तिच्या हातातील अंगठीने सर्वांचे लक्ष वेधले होते. लंडनमध्ये असताना आणि तेथून परतल्यानंतरही दिपिकाच्या हातात ही अंगठी दिसते. लंडनमध्ये असताना रणवीरने ही अंगठी तिला दिल्याची शंका चाहत्यांना आहे. म्हणूनच की काय हल्ली रणवीरला तिच्या हातातील अंगठीसोबतच्या फोटोवर टॅग करुन ‘ही अंगठी तूच दिलीस का?’ असा प्रश्न विचारला जात आहे.
वर्षाच्या सुरूवातीला दीपिका आणि रणवीरमध्ये ब्रेक-अप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या फक्त अफवाच आहेत हे त्यांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिले. काही दिवसांपूर्वी तर युवराज सिंगसोबत एका मित्राच्या बर्थडे पार्टीवेळी हे दोघे एकत्र दिसले होते. त्यामुळे लवकरच ही ‘बाजीराव- मस्तानी’ची जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येतील, अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.
@RanveerOfficial IS THIS TRUE pic.twitter.com/xttbyNNP04
— Rani Padmavati
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 9:54 am
Web Title: fans tease ranveer singh about the ring on deepika padukones finger