बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी ती अभिनेता फराज खानमुळे चर्चेत आहे. फराज सध्या बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला तीसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. उपचारासाठी त्याला २५ लाख रुपयांची गरज आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याला आर्थिक मदत करा, अशी विनंती पूजा भट्टने देशवासीयांना केली आहे.

अवश्य पाहा – “जातिनिहाय आरक्षण बंद करा”; कंगना रणौतची सरकारकडे मागणी

“सर्वांनी मिळून खरच खूप मदत केली. फराजच्या वैद्यकिय उपचारासाठी मदत करणाऱ्यांचे मनापासून आभार. आतापर्यंत आपण सर्वांनी मिळून १४ लाख ४५ हजार ७७४ रुपये गोळा केले आहेत. फराजच्या उपचारासाठी आणखी १० लाख ५४ हजार २२६ रुपयांची गरज आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन पूजाने मदतीची विनंती केली आहे. यापूर्वी सलमान खानने देखील फराजच्या उपचारासाठी मदत केली होती.

अवश्य पाहा – “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; महेश भट यांच्या सुनेला अमायराचा इशारा

फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर ‘पृथ्वी’, ‘मेहंदी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केलं होतं. परंतु २००८ नंतर त्याला फारसं काम मिळलं नाही. त्याच दरम्यान त्याला कर्करोग देखील झाला. परिणामी अभिनयापासून हळूहळू तो दूर होत गेला. सध्या बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.