20 November 2019

News Flash

‘भाग मिल्खा भाग’ला सहा वर्ष पूर्ण, फरहान अख्तरची भावूक पोस्ट

या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा वर्ष झाल्यानिमित्ताने फरहानने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

भाग मिल्खा भाग

सध्या अभिनेता फरहान अख्तर आगामी ‘तुफान’ चित्रपटाची जय्यत तयारी करत आहे. या चित्रपटात एका बॉक्सरचा संघर्ष दिसणार आहे. ‘तुफान’शिवाय फरहान ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झाहीरा वसीम या देखील झळकणार आहेत. शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबरला दिग्दर्शित होणार आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी सुपरहिट ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट फरहानच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. फरहानसाठी हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटात मिल्खा सिंग यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात सोनम कपूर, दिव्या दत्त यांच्याही भूमिका होत्या.

या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा वर्ष झाल्यानिमित्ताने फरहानने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे की, ६ वर्षांपूर्वी या चित्रपटाने माझे आयुष्य बदलून टाकले. या चित्रपटाला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी माझ्या मनात आदर आहे.”

सोनम कपूरने देखील हा दिवस साजरा करत एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केली आहे.

First Published on July 12, 2019 5:34 pm

Web Title: farhan akhtar bhaag milkha bhaag 6 years djj 97
Just Now!
X