सध्या देशभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीचे सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक २०१९ संदर्भात काही ट्विट कले आहे. या एका ट्विटने फरहान सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

फरहानने १९ मे रोजी सकाळी लोकसभा निवडणूक संदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने भोपाळच्या मतदरांना आज मतदान करण्यास सांगितले आहे. परंतु भोपाळ विभागाचे मतदान हे १२ मे रोजी पार पडले होते. वास्तविकतेचा विचार न करता फरहानने भोपाळच्या मतदारांना मतदान करण्यास सांगितले.

‘प्रिय भोपाळच्या मतदारांनो, आपल्या शहराला आणखी एका गॅस शोकांतिकेमधून वाचण्याची हीच खरी वेळ आहे’ असे फरहानने ट्विटमध्ये लिहिले होते. त्याचे हे ट्विट वाचताच अनेक नेटकऱ्यांनी फरहानला ट्रोल केले आहे. फरहानला लोकसभा निवडणूकीचे किती महत्व आहे हे दिसते, फरहानचे डोके ठिकाणावर आहे का?, भोपाळचे मतदान झाले आहे, फरहान पहिले लोकसभा निवडणूकीच्या तारखा पाहा अशा अनेक कमेंट ट्रोलर्सने केल्या आहेत.

आता सर्वांनाच फरहानच्या पुढच्या ट्विटची आतुरता आहे. आज १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. हे मतदान ७ राज्यांतील ५९ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे दोघंही या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. शिबानी आणि फरहान अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात, तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे.