गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याच दिवसाचा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने भेटकार्ड आणि भेटवस्तूंच्या दुकानांमध्येही काही खास वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पण, खरंच एक वस्तू किंवा एका भेटकार्डाने फारफार तर या एका दिवसाने बाबांचे आभार मानता येणार आहेत का.., हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात घर करत आहे. ‘फादर्स डे’चा हा एकंदर उत्साह पाहता अभिनेता ललित प्रभाकरला याविषयी त्याचं मत विचारलं असता ‘मी फादर्स डे वगैरे काही सेलिब्रेट करत नाही’, असं तो म्हणाला.

‘मुळात गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड वाढला आहे. त्या ट्रेंडच्या पठडीत मी बसत नाही. मुळात मला ते जमत नाहीत आणि आवडतही नाहीत असं ललितने स्पष्ट केलं. बाबा मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा आम्ही तो क्षण जगतो, त्या क्षणाचा आनंद घेतो. माझे आई- बाबा कल्याणला राहात असल्यामुळे आणि माझ्या कामाच्या वेळापत्रकामुळे कधीकधी फार कमी भेट होते. पण, जेव्हा जेव्हा आमची भेट होते तो क्षण महत्त्वाचा असतो’, असं म्हणत ललितने या दिवसाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मांडला.

Digestion Reduce Bad Breathe How To make Mouth Smell Fresh
१ चमचा बडीशेपमध्ये ‘हे’ दोन पदार्थ घालून तोंडाची दुर्गंधी ते अपचन दोन्ही त्रास करा दूर; फायदे वाचून लगेच बनवाल हे मिश्रण
From May To August Shani Maharaj Walk With Golden Feet In Kundal
सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत
model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!

lalit-prabhakar

बाबांद्दलची एखादी आठवण विचारली असता ललिलने फार सुरेख आठवण सांगितली. ही आठवण सांगताना त्याचा आनंदही व्यक्त होत होता. याविषयीच सांगताना तो म्हणाला, ‘मी लहान असल्यापासूनच बाबा नेहमीच आपण सगळे गोव्याला जाऊया, गोव्याला जाऊया असं म्हणायचे. पण, कामाच्या व्यापात त्यांना ते काही शक्य झालं नाही. मागच्या वर्षी मी विमानाचं तिकीट काढून शेवटी त्यांना आणि आईला गोव्याला पाठवलं. त्यावेळी ते पहिल्यांदाच विमानात बसले होते. मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो नव्हतो पण, गोव्याची ती छोटीशी सहल त्यांना आणि मलाही आनंद देऊन गेली.’

Fathers Day 2017: …‘हे’ सेलिब्रिटी साजरा करणार त्यांचा पहिला ‘फादर्स डे’

एक मुलगा म्हणून आणि एक अभिनेता म्हणून त्यांना माझा फार अभिमान आहे. आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रपरिवाराला माझ्याविषयी सांगतानाही त्यांना अभिमान वाटतो. त्यांना माझा जितका अभिमान आहे तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ते माझी काळजी करतात. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी कोणत्या एका दिवसाची वाट का पाहावी, असा प्रश्नही ललितने इथे उपस्थित केला. कित्येकदा नात्यांमध्ये काहीच बोलण्याचीही गरज नसते. कारण तुमच्या कृतीतूनच भावनाही व्यक्त होत असतात, असं म्हणत ललितने त्याच्या जीवनात असलेलं वडिलांचं महत्त्व सांगितलं.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com