मुंबई : मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील १७९ जाहिरात फलकांपैकी तब्बल ९९ फलक महाकाय आहेत. ४० बाय ४० फूट आकारापेक्षाही हे फलक मोठे असून ते तत्काळ हटवावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे प्राधिकरणाला दिले आहेत. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पश्चिम आणि मध्य रेल्वेला आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ही नोटीस पाठवली आहे.

मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील एकाही जाहिरात फलकाला पालिकेची परवानगी घेतलेली नाही. तसेच या जाहिरातीसाठी पालिका प्रशासनाकडे जाहिरात शुल्कही भरले जात नाही. मुंबईत जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या जाहिरात फलकाला मुंबई महापालिका प्रशासन परवानगी देत असते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक त्यापेक्षाही मोठे आहेत. काही ठिकाणी लांबी रुंदी १२० फूट म्हणजेच १४ हजार चौरस फूट इतके महाकाय जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना पालिकेची परवानगी नाही. त्यामुळे हे फलक पालिकेच्या लेखी बेकायदेशीर आहेत. पालिकेच्या हद्दीतील एकूण १७९ जाहिरात फलकांपैकी महाकाय असे ९९ महाकाय फलक ताबडतोब हटवावे, याकरीता पालिका प्रशासनाने रेल्वेला नोटीस पाठवली आहे. हे फलक न हटवल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत हे फलक पालिकेतर्फे हटवण्यात येतील, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबईत किती फलक आहेत, कोणत्या प्राधिकरणाच्या हद्दीत किती फलक आहेत, किती फलक महाकाय आहेत, किती अनधिकृत आहेत याची माहिती पालिकेच्या विविध विभागांमधून मागवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. सर्वाधिक २२ महाकाय फलक शिवडी, नायगाव परिसरात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai votes report, Mumbai marathi news
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत, पालघरमध्ये सर्वात कमी; ‘मुंबईवोट्स’ या संस्थेच्या अहवालातून समोर
controversy over chhatrapati shivaji maharaj s jiretop on modi head
मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड; छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Bhavesh Bhinde arrested
मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Mumbai rdx india marathi news, Pakistan rdx Mumbai marathi news
पाकिस्तानातून मुंबईत आरडीएक्स येणार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा दूरध्वनी; रेल्वे स्थानक आणि परिसरात गस्त वाढवली
Case against two candidates, Sanjay Patil from North East Mumbai lok sabha
खर्च तपासणीस उपस्थित न राहिल्यामुळे ईशान्य मुंबईतील ‘संजय पाटील’ नावाच्या दोन उमेदवारांविरुध्द गुन्हा

हेही वाचा – अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत शिवनेरीची लाखोंची कमाई, तीन दिवसांत पाच लाख रुपये उत्पन्न

मुंबई महापालिकेची परवानगी घेऊन जे फलक उभारले जातात. त्यांची दरवर्षी संरचनात्मक तपासणी केली जाते. परवाना नूतनीकरणासाठी किंवा फलक एलईडी करण्यासाठी पालिकेकडे संस्था येतात तेव्हा त्यांच्याकडून संरचनात्मक तपासणीचे प्रमाणपत्र घेतले जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात संस्थेचे काळा इतिहास

घाटकोपर येथे महाकाय फलक उभारणाऱ्या जाहिरात संस्थेचे नाव काही वर्षांपूर्वी रेल्वेने काळ्या यादीत टाकले होते. या संस्थेने पूर्वी गुज्जू या नावाने कंत्राटे मिळवली होती. आता नाव बदलून हीच संस्था फलकांवर जाहिराती करत आहे. मुंबईत विविध ठिकाणी या संस्थेचे अनेक जाहिरात फलक असून दादरच्या टिळक पुलाच्या परिसरातही या कंपनीचे आठ मोठे फलक आहेत.

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय ?

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ९९ ठिकाणी एकूण १३८ लोखंडी जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांचा कालावधी ५ वर्ष ते कमाल ७ वर्षांपर्यंत आहे. फलकांचा कमाल आकार १०० बाय ४० चौरस फूट आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट नियमितपणे केले जाते. अभियांत्रिकी विभागाकडून फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले आहे. तसेच तपशीलवार स्ट्रक्चरल ऑडिट केले जात असून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या सूचनेनुसार लवकरच ते पूर्ण केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – मुंबई: दुर्घटनास्थळावरून अन्य तीन जाहिरात फलकही हटवणार, बुधवारी संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करणार

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण ११६ ठिकाणी एकूण १३७ लोखंडी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. फलकांचा कालावधी ५ ते ७ वर्षांपर्यंत आहे. फलकाचा कमाल आकार १२२ बाय १२० चौरस फूट आहे. त्यांचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. फलकांच्या स्थिरतेच्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले आहे आणि मान्सूनच्या तयारीचा एक भाग म्हणून तपशीलवार स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.