बॉलीवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर एकेकाळी लोकप्रिय मॉडेल होती. महीपने आता एका मुलाखतीत तिच्या व पतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. सध्या ती तिची मुलगी शनाया कपूरच्या पदार्पणाची तयारी करत आहे. मुलाखतीत तिने संजयच्या विवाहबाह्य संबंधांचा खुलासा केला आहे. पतीने फसवणूक केल्याने महीपने त्याला सोडलं होतं, पण मुलीसाठी ती परत संजयकडे परतली होती.

पती संजय कपूरच्या अफेअरबद्दल जान्हवी कपूरची काकू महीप कपूर झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना डेट केलं आहे, त्याने भूतकाळात केलेल्या सर्व घाणेरड्या गोष्टींची त्याला जाणीव आहे. याच कारणाने तो मुलीबद्दल जास्त विचार करतो. मुलगी शनायाच्या बाबतीत तो अक्षरशः वेडा होतो. मुलाबद्दल तसा तो वागत नाही, पण शनायाच्या बाबतीत मला त्याला शांत करावं लागतं. पण तो असा का वागतो ते आता मला कळालंय, त्याला वाटतं की जसा तो वागला तसंच एखादा मुलगा शनायासोबत वागला तर काय होईल. आता तो शनायाच्या बाबतीत कदाचित आधीपेक्षा थोडा शांत झालाय.”

“तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असला तरी…”, अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं विधान; म्हणाला, “अर्जुन, सोनम किंवा जान्हवी…”

पती संजय कपूरच्या अफेअरबद्दल महीप म्हणाली, “मला वाटतं की लोक एका ठराविक साच्यातून बाहेर पडून एखाद्या व्यक्तीला पाहू इच्छित नाहीत आणि त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून समजून घेण्याचा प्रयत्न करू इच्छित नाहीत. प्रत्येकाला ब्रेक द्या, कोणीच परफेक्ट नाही. प्रत्येक जण कधी ना कधी या टप्प्यातून जाणार आहे आणि यामध्ये कोणतीही अडचण नाही.”

“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’च्या दुसऱ्या सीझनमध्ये महीपने सीमा सजदेहसमोर पतीचं घर सोडल्याची कबुली दिली होती. “सीमा, आता तुलाही माहित आहे. माझ्या लग्नाच्या सुरुवातीला संजय खूप विचित्र वागत होता. त्यामुळे मी शनायासोबत घर सोडून निघून गेले होते. मी स्वतःसाठी उभे राहिले, पण शेवटी माझ्याकडे एक लहान बाळ होतं. त्यामुळे एक स्त्री आणि एक आई म्हणून माझं प्राधान्य माझं बाळ होतं. मी माझ्या मुलीसाठी तिच्या अद्भूत वडिलांची ऋणी आहे. मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं की जर हे नातं तुटलं असतं तर मला आयुष्यभर पश्चाताप झाला असता. कारण जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझा नवरा घरी येतो, तेव्हा ते घर त्यांचं हक्काचं ठिकाण असतं. त्यामुळे त्यांना तिथं शांत वाटायला पाहिजे,” असं महीप कपूर म्हणाली.