‘दंगल’ फेम फातिमा सना शेख हिचं नाव काही दिवसांपासून अभिनेता आमिर खानसोबत जोडलं गेलं. फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र फातिमानं कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
लोक काहीतरी म्हणतीलच त्यांचं कामच आहे बोलणं असं म्हणत फातिमानं या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. आमिरचं स्थान माझ्या आय़ुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. मात्र लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे मला स्वत:वर परिणाम करून घ्यायचा नाही असंही फातिमा म्हणाली. आमिरसोबतचं फातिमाचं नातं खुद्द आमिरची पत्नी किरण रावनंही फेटाळून लावलं होतं.
आमिरव्यतिरिक्त फातिमाचं नाव अपारशक्ती खुरानासोबतही जोडलं गेलं. अपारशक्तीनं दंगल चित्रपटात फातिमाच्या भावाची भूमिका साकारली होती. जुलै महिन्यात या दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहण्यात आलं होतं. मात्र अपारशक्तीसोबतच्या नात्याबद्दलच्या चर्चाही फातिमानं फेटाळून लावल्या.