बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. अक्षय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अक्षयने PUBG या गेम सारखा FAU-G Fearless and United Guards हा भारतीय गेम लॉंच केला आहे. हा मेड इन इंडिया मल्टी- प्लेयर मोबाइल गेम आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात लॉंच करण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अक्षयने इन्स्टाग्रामवर या गेमचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. “FAU-G Fearless and United Guards. शत्रुचा सामना करा. आपल्या देशासाठी लढा. आपल्या ध्वजाचे संरक्षण करा. Fearless and United Guards – FAU-G हा गेम आपल्याला फ्रंटलाइन आणि त्यापलीकडे नेईल! तुमच्या मिशनची सुरूवात आज करा.” अशा आशयाच कॅप्शन अक्षयने त्या गेमचा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे. या व्हिडीओला १ तासाच्या आत ८ लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आणखी वाचा- प्रतीक्षा संपली! अखेर ‘मेड इन इंडिया’ FAU-G झाला लाँच, कुठून करायचा डाउनलोड? जाणून घ्या डिटेल्स

हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि अक्षयने डेव्हलप केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा एकदा PUBG Mobile India आल्या नंतर आता त्या गेमसोबत FAU-G ची कडी टक्कर पाहायला मिळणार आहे.