‘थलैवा’ आणि ‘सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांचा आणखी एक चित्रपट सध्या चर्चेत आहे. तो चित्रपट म्हणजे ‘२.०’. या चित्रपटातून ते खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकणार आहेत. आघाडीच्या कलाकारांची ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्यासोबतच हा चित्रपट आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे चित्रपटाचा निर्मिती खर्च.

सध्याच्या घडीला संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘२.०’ हा चित्रपट निर्मिती खर्चाच्या बाबतीत आघाडीवर दिसत असून आतापर्यंत या चित्रपटाच्या बजेटने जवळपास ४५० कोटींचा आकडा गाठला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या बजेटमध्ये निर्मात्यांनी आणखी वाढ केली असून, जवळपास १०० कोटींची भर त्यात घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हे आकडे अनेकांनाच्याच भुवया उंचावून जात आहेत. हा चित्रपट पूर्णपणे तयार होईपर्यंत दिग्दर्शक त्यासाठी सर्वस्व पणाला लावून काम करताना दिसत आहे. त्यातही पोस्ट प्रॉडक्शन आणि वीएफएक्सवरच चित्रपटाची मदार असल्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टींशी कोणतीच तडजोड करण्यासाठी ते तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाची होणारी चर्चा पाहता तो प्रदर्शित झाल्यानंतरही दर्जेदार नजराणा सादर करण्याचीच इच्छा या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती मुख्य म्हणजे निर्माणे मनी बाळगून आहेत. ज्यामुळेच पुन्हा एकदा बजेटमध्ये कोट्यवधीची वाढ करण्यात आल्याचं कळत आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

बऱ्याच काळापासून या चित्रपटासाठी कलाकारांची फौज मेहनत घेत आहे. त्याशिवाय या चित्रपटाची स्टारकास्ट पाहता तीसुद्धा एक जमेची बाजू ठरत आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘२.०’ला बॉक्स ऑफिसवर नेमका किती प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.