News Flash

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर झाली अँजिओप्लास्टी

मुंबईमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अँजिओप्लास्टी झाली आहे. छातीत दुखू लागल्यामुळे अनुरागला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून अनुराग आरोग्याशी संबंधीत समस्यांना समोरे जात होता. मात्र, जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची अँजिओप्लास्टी झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

अनुराग कश्यपच्या प्रवक्त्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ला यासंदर्भात माहिती दिली की ‘हो अनुरागची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. डॉक्टरांनी त्याला आराम करण्यास सांगितले आहे.’

गेल्या काही दिवसांपासून अनुराग ‘दोबारा’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनवर अनुराग घरातून काम करत होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च महिन्यात पूर्ण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 2:33 pm

Web Title: filmmaker anurag kashyap undergoes angioplasty avb 95
Next Stories
1 गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्रीने केली लिंगबदल सर्जरी, शेअर केला शर्टलेस फोटो
2 …म्हणून ‘किस’ कॉन्ट्रोव्हर्सीला विसरुन राखीने धरले मिकाचे पाय
3 “मला बऱ्याचदा आधीच त्या पुरुषांचे मनसुबे लक्षात यायचे”, नीना गुप्ता यांचा खुलासा
Just Now!
X