सोशल मीडिया हे सध्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या ठिकाणी पोस्ट केलेल्या पोस्टचे परिणाम गंभीर होऊ शकतात, अगदी गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो. असाच प्रकार घडला आहे प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाच्या बाबतीत. अयाजुद्दीन सिद्दीकीने म्हणजे नवाजच्या भावाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट धार्मिक भावना दुखावणारी असल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हिंदू युवा वाहिनीने ही तक्रार नोंदवली आहे. अयाजुद्दीन सिद्दीकने भगवान शंकराचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला त्यामुळे आम्ही ही तक्रार करतो आहोत असे हिंदू युवा वाहिनीने म्हटले आहे.

एका व्यक्तीने भगवान शंकराचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला होता. या पोस्टला मी विरोध करत असा फोटो तुम्ही पोस्ट करू शकत नाही. अशा फोटोमुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात असे असे म्हटल्याचे अयाजुद्दीन सिद्दीकीने म्हटले आहे. मलाच हा फोटो आक्षेपार्ह आणि चुकीचा वाटला होता. म्हणूनच मी या फोटोला विरोध दर्शवला असे असूनही माझ्याच विरोधात तक्रार दाखल करण्या आली आहे ज्याला काहीही अर्थ नाही असेही अयाझुद्दीनने म्हटले आहे. तसेच माझ्यावर झालेल्या आरोपांचीही चौकशी झाली पाहिजे असेही अयाजुद्दीनने म्हटले आहे.

हिंदू युवा वाहिनीच्या एका कार्यकरर्त्याने रविवारी मुझफ्फरनगरच्या बुधाना पोलीस ठाण्यात अयाजुद्दीन सिद्दीकी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर उप पोलीस अधीक्षक हरिराम यादव यांनी अयाजुद्दीन विरोधात कलम १५३ ए नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे सगळे प्रकरण समोर आले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.