सध्या देशात लॉकडाउनचा काळ सुरु आहे. त्यामुळे याचा परिणाम कलाविश्वावरही झाला आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. त्यामुळे अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे चित्रपटांप्रमाणेच आता नाटकंदेखील ऑनलाइन स्वरुपात सादर होऊ लागली आहेत. अलिकडेच ‘मोगरा’ हा लाईव्ह नाटक सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सध्या ऑनलाइन नाटक हेच भविष्य असल्याचं संगीत दिग्दर्शक अजित परब म्हणाले.

हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ हे इंटरनेटवरील पहिलं ऑनलाइन नाटक आहे. त्यामुळे सध्या या नाटकाची जोरदार चर्चा सुरु आहे. या नाटकात स्पृहा जोशी, वंदना गुप्ते असे दिग्गज कलाकार झळकले असून अजित परब यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे. त्यामुळे या नाटकाविषयी अजित परब यांनी मत व्यक्त केलं आहे.

Ajit pawar explaination on controversial statement
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

“हृषिकेश जोशीने एकदा अचानक मला फोन केला आणि मोगरासाठी संगीत देशील का विचारलं. यावेळी तो नाटकाची संकल्पना सांगत असतानाच मला ती प्रचंड आवडली होती. त्यामुळे मी लगेच माझा होकार कळवला. कारण आत्तापर्यंत मी असा नाटकाच्या बाबतीतला नवीन प्रयोग कधीच पाहिला नव्हता. पण ज्यावेळी ऑनलाइन नाटकाची खऱ्या अर्थाने तालीम सुरु झाली त्यावेळी येणाऱ्या अडचणी, मर्यादा लक्षात येऊ लागल्या”, असं अजित परब म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “या नाटकात पाच वेगवेगळ्या स्वभावच्या व्यक्तिरेखा होत्या. त्यामुळे या पाचही व्यक्तिरेखांना स्वतंत्र संगीत द्यायचं होतं. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी शिकत गेलो आणि हा नवा प्रयोग फार रंजक झाला”. दरम्यान, अजित परब हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नावं असून त्यांनी ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘लोकमान्य’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शकाचं काम केलं आहे.