अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्या ‘बेशरम’ चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरचे अनावरण पुढील आठवड्यात होणार आहे. या ट्रेलरचे अनावरण मल्टिप्लेक्समध्ये न करता एका अनाथालयात करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण अनाथालयात होण्याची ही पहिलीच वेळ असून, चित्रपटात रणबीर ‘पेप्सी’ नावाच्या एका अनाथ मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनव कश्यप दिग्दर्शित बेशरम चित्रपटात रणबीर कपूर आणि पल्लवी शरद यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटात रणबीरचे आई-वडिल ऋषी कपूर आणि नितू सिंग यांनीसुद्धा काम केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘बेशरम’च्या पहिला ट्रेलरचे अनावरण अनाथालयात
अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्या 'बेशरम' चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरचे अनावरण पुढील आठवड्यात होणार आहे.

First published on: 24-07-2013 at 10:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First trailer of ranbir kapoors besharam to launch at an orphanage