हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मिशन इम्पॉसिबल – ५’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टॉमच्या संतापाला वैतागून पाच कर्मचाऱ्यांनी या बिग बजेट प्रोजेक्टला रामराम ठेकला आहे. हे पाचही जण सेटवरील महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत होते. मात्र त्यांनी अर्ध्यावरच प्रोजेक्ट सोडल्यामुळे मिशन इम्पॉसिबलचं प्रदर्शन आता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवश्य पाहा – ‘वंडर वुमन’चा ओपनिंग सीन पाहिलात का?; १३ वर्षीय अभिनेत्रीचे स्टंट पाहून तोंडात बोटे घालाल

संपूर्ण जग सध्या करोनाग्रस्त वातावरणामुळे त्रस्त आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही विशेष परवानगी मिळवून टॉम क्रूज ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे चित्रीकरण करत होता. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या ठिकाणी करोनाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. मात्र टीममधील हे पाच कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे संतापलेल्या टॉमने त्यांना चित्रपटातून बाहेर काढण्याची धमकी दिली. मिळालेल्या धमकीमुळे कर्मचारी संतापले अन् त्याक्षणी ते सेट सोडून निघून गेले. कर्मचाऱ्यांच्या मते टॉमने सर्वांसमोर त्यांच्या इभ्रतीचे वाभाडे काढले. त्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली परिणामी त्यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

‘मिशन इम्पॉसिबल’ ही एक गुप्तहेर चित्रपटांची सीरिज आहे. या चित्रपटांची कथा इथर हंट या अमेरिकन गुप्तहेराभोवती फिरते. ही व्यक्तिरेखा अभिनेता टॉम क्रुज याने साकारली आहे. खरं पाहाता ही सीरिज अगदी जेम्स बॉण्डसारखीच आहे. परंतु यामध्ये बॉण्ड चित्रपटांपेक्षाही अधिक खतरनाक स्टंट्स पाहायला मिळतात. लक्षवेधी बाब म्हणजे हे सर्व स्टंट चित्रपटातील कलाकार स्वत:च करतात. किंबहुना स्टंट करण्याची तयारी असलेल्या कलाकारांनाच या चित्रपटात झळकण्याची संधी मिळते. ‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजच्या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर झळकले होते. या चित्रपटाचं नाव ‘मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल’ असं होतं. या चित्रपटात अनिल कपूर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रेंचाईजी आता भारतातही खूप लोकप्रिय झाली आहे.