News Flash

फ्रेंडशिप डे निमित्त ‘यारी दोस्ती स्पेशल संडे’

अशी ही बनवाबनवी’ सारखे आणखी तीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

खरी मैत्री जर असेल तर ती आयुष्यभर टिकते अस मानलं जातं. ही गोष्ट बऱ्याच चित्रपटांद्वारे अधोरेखित करण्यात येते. म्हणूनच झी टॉकीज फ्रेंडशिप डे  निमित्त घेऊन येत आहे चार सुपरहिट चित्रपटांचा नजराणा.

नागराज मंजुळे दिग्दर्शित, बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जाणारा सुपरहिट चित्रपट ‘सैराट’ रविवार २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रसारित होणार आहे.  महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या त्रिकुटाच्या अभिनयाने नटलेला 1985 सालचा सुपरहिट विनोदी चित्रपट ‘धूम धडाका’ दुपारी 3 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ संध्याकाळी ६  वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने ज्या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीतमध्ये पदार्पण केले असा आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट ‘लय भारी’ रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाद्वारे या मोहोत्सवाचा समारोप होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 5:03 pm

Web Title: friendship day special movies avb 95
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघात; रुग्णालयात उपचार सुरु
2 ‘सुशांतच्या घरातले केवळ पैशांकडे लक्ष देतायेत पण…’, कंगना संतापली
3 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी केलं भाष्य; म्हणाले…
Just Now!
X