News Flash

FWICEच्या सदस्यांच्या लसीकरणास सुरूवात, आदित्य चोप्रांनी घेतला पुढाकार!

पहिल्या टप्प्यात 3500-4000 लोकांना देण्याचा प्रयत्न

30,000 नोंदणीकृत सदस्यांना लस देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे वायआरएफने ठरवले आहे

यश राज फिल्म्स या भारतातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन हाऊसने हिंदी चित्रपटसृष्टीतील सदस्यांना लस पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे. सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक असलेल्या लसीकरण मोहिमेची सुरुवात आदित्य चोप्रा यांनी केल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कामगारांना पुन्हा काम सुरू करता येणार आहे. भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात यामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे मागील वर्षापासून या क्षेत्रात काम बंद आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी आदित्य चोप्रा यांनी आपल्या भव्य वायआरएफ स्टुडिओजचे दरवाजे खुले केले आहेत. पहिल्या टप्प्यात किमान 4000 कामगारांना इथे लस देण्यात येणार आहे. FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज)च्या 30,000 नोंदणीकृत सदस्यांना लस देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे वायआरएफने ठरवले आहे. मुंबईत वायआरएफच्या स्टुडिओत घेतलेल्या या आधीच्या टप्प्यात कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस दिली होती.

यश राज फिल्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी म्हणाले, “वायआरएफच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर आमच्या सिनेमातील क्रू मेंबर्ससाठी आम्ही लसीकरण सुरू केले आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीसाठी लसीकरण मोहीम सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यामुळे आमच्या या क्षेत्रातील रोजंदारीवरील कामगारांना पुन्हा काम सुरू करता येईल आणि त्यांना, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभू शकेल. संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे लागेल. त्यामुळे ही मोहीम टप्प्या-टप्प्यांमध्ये पार पडेल. आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आम्ही साधारण 3500-4000 लोकांना लस देऊ शकू. या जागतिक महासंकटाचा प्रचंड परिणाम झालेल्या या क्षेत्राला पुन्हा सुरू करण्यात साह्य करण्यास वायआरएफ बांधिल आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 5:49 pm

Web Title: fwice members taking vaccines owing of aditya chopra yrf avb 95
Next Stories
1 एंथोलॉजी सीरिज ‘रे’ चा ट्रेलर रिलीज; चार जबरदस्त कहाण्यांच्या फ्यूजनसाठी व्हा तयार !
2 ‘तू तुझ्या वयाच्या अभिनेत्रींसोबत कधी काम करणार?’ सोफियाने सलमानला केला सवाल
3 या कारणामुळे नुसरतने तो टॅट्यू ठेवलाय अपूर्ण
Just Now!
X