27 September 2020

News Flash

‘गदर’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या १५ वर्षांपासून या सीक्वलवर काम सुरु आहे

उत्तम डायलॉग्स आणि गाण्यांचा भरणा असलेला ‘गदर -एक प्रेम कथा’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेमध्ये झळकले होते. लवकरच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टीममधील एका व्यक्तीने ही माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या चित्रपटाच्या कथेचं सूत्रदेखील गदरप्रमाणेच भारत- पाकिस्तान या विषयाभोवती फिरताना दिसणार आहे. त्यासोबतच या सिक्वेलमध्येही तारा(सनी दिओल), सकीना(अमिषा पटेल) आणि त्यांचा मुलगा जीत या तीन मुख्य पात्रांभोवतीच ही कथा फिरणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही या सीक्वलसाठी काम करत असून सध्या आम्ही सनीशी या चित्रपटासंदर्भात चर्चा करत आहोत”, असं चित्रपटाच्या टीममधील व्यक्तीने सांगितलं.

१८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर-एक प्रेम कथा’ ने त्यावेळी २५६ कोटींचा गल्ला कमावला होता. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वेल कसा असेल आणि बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 3:34 pm

Web Title: gadar ek prem katha is all set for a sequel after two decades
Next Stories
1 टीव्ही अभिनेता करण सिंह ओबेरॉयला अटक, महिला ज्योतिषाने केला बलात्काराचा आरोप
2 ‘सेक्रेड गेम्स २’च्या स्टारकास्टचे सिक्रेट संपले, हे दोन कलाकार येणार प्रेक्षकांच्या भेटीस
3 बिग बी – चाहत्यांच्या ‘एका रविवारची कहाणी’
Just Now!
X