News Flash

Video : ‘Game Of Thrones Season 8’ चा टीझर प्रदर्शित

यावेळी शोच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली.

उत्तम पटकथा, अभिनय आणि अ‍ॅनिमेशनचा तडका असलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक नव्या सीरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या मालिकेचे सात सिझन प्रदर्शित झाले असून आठवा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या आठव्या सिझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या शोच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली.

प्रदर्शित झालेला टीझर ९० सेकंदांचा असून यामध्ये तीन महत्वपूर्ण पात्र दाखविण्यात आली आहेत. या टीझरमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे फायनल सिझनचा शेवट कसा असेल, याचा अंदाज लावता येत आहे. हा टीझर प्रदर्शित होऊन अवघ्या काही काळामध्ये त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

.

‘गेम ऑफ थ्रोन्स ८’मध्ये केवळ ६ एपिसोडचा समावेश करण्यात आला असून या प्रत्येक एपिसोड चित्रपटाएवढा मोठा असणार आहे. या सिझनमध्ये आर्यन थ्रोनवर कोण बसणार? Azor Ahai कोण आहे? CleganeBowl कोण जिंकणार आणि Cersei ला कोण मारणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

२०१७ मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा ७ वा सिझन प्रदर्शित झाला होता. मात्र २०१८ मध्ये याचा नवा सिझन प्रदर्शित करण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंटा शिगेला पोहोचली होती. मात्र आता हा नवा ८ वा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून त्याचा पहिला शो १४ एप्रिल २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 11:56 am

Web Title: game of thrones season 8 date officially announced by hbo
Next Stories
1 …म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक
2 #MeToo : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप
3 Video : ‘मी पण सचिन’साठी स्वप्नील करतोय अशी मेहनत
Just Now!
X