27 February 2021

News Flash

निक-प्रियांकाच्या घरी चिमुकलीचं आगमन

प्रियांका झाली काकू; सोफी सोफी टर्नरला कन्यरत्न

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी ही जोडी अनेक वेळा एकमेकांसोबतचे फोटो किंवा एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असल्यामुळे चर्चेत येत असतात. परंतु, या वेळी या दोघांची एका वेगळ्या कारणासाठी चर्चा होत आहे. निक आणि प्रियांकाच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

जोनास ब्रदर्समधील जो जोनास पिता झाला आहे तर अभिनेत्री सोफी टर्नर आई झाली आहे. सोफी टर्नरने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सध्या या बाळाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यातच सोफीने बाळा जन्म दिल्यामुळे प्रियांका आणि निक काका-काकू झाले आहेत. त्यामुळे सहाजिकचं त्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फिल्मफेअरने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सोफीने २२ जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला असून Willa असं या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. सोफी तिच्या प्रेग्नंसी काळात चांगलीच चर्चेत होती. अनेक वेळा तिने इन्स्टावर तिच्या बेबीबंपसोबतचे फोटो शेअर केले होते.

दरम्यान, सोफी आणि जो यांनी २०१७ मध्ये पॅरिस येथे मोठ्या थाटात लग्न केलं. सोफी आणि प्रियांका एकमेकींच्या जावा असूनदेखील त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा या दोघी एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 1:26 pm

Web Title: game of thrones star sophie turner husband joe jonas welcome first child its a girl ssj 93
Next Stories
1 ‘कपिल शर्मा शो’च्या पहिल्याच भागात होणार सोनू सूदची एण्ट्री?
2 “दया बेन आली तर ठिक, नाहीतर…”; दिशा वकानीच्या कमबॅकवर निर्मात्यांचं मोठं विधान
3 बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जॅकलीन फर्नांडिस व्यक्त; म्हणाली, ‘मला कामाची गरज आहे म्हणून…’
Just Now!
X