News Flash

Ganesh Utsav 2017 PHOTO : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन

शाहरुख खान याच्याही घरी सात दिवसांकरिता बाप्पाचे आगमन होते

शाहरुखच्या मन्नत या बंगल्यावर दरवर्षी गणरायाचे आगमन होते.

अभिनेता सलमान खानच्या घरी बसणाऱ्या गणरायाची नेहमीच चर्चा केली जाते. गणरायाचे आगमन, त्याच्यासाठी करण्यात येणारी सजावट, दर्शनाला येणारे सेलिब्रिटी तसेच विसर्जनाला असणारा जल्लोष यासह प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. पण, बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याच्याही घरी सात दिवसांकरिता बाप्पाचे आगमन होते हे कमी जणांना माहित असेल. शाहरुखच्या घरीही गणरायाचे आगमन होते आणि त्याची साग्रसंगीत पण कोणाताही गाजावाजा न करता पूजा केली जाते.

वाचा : Judwa 2 song ‘सुनो, गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरियाँ..’

शाहरुखच्या मन्नत या बंगल्यावर दरवर्षी गणरायाचे आगमन होते. सलमानच्या घरी मोठ्या उत्साहात आणि थाटात हा सण साजरा केला जातो त्याच्या अगदी उलट शाहरुखच्या घरचे वातावरण असते. अगदी साध्या पद्धतीने गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्व तयारी करण्यात येते.

काल सर्वत्र गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शाहरुखनेही पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि छोटा मुलगा अब्राम यांच्यासह गणरायाचे विसर्जन केले. बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी शाहरुख स्वतः त्याच्या कुटुंबासह समुद्रावर गेलेला. मात्र, यावेळी त्याचा मोठा मुलगा आर्यन हा तेथे उपस्थित नव्हता. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी त्यावेळी चाहत्यांनी बरीच गर्दी केल्याचे दिसले.

वाचा : दिलीप कुमार यांना बिल्डरला द्यावे लागणार २० कोटी रुपये

आपल्या वडिलांप्रमाणे कॅमेऱ्याला अगदी सहजपणे सामोरा जाणारा अब्राम यावेळी काहीसा घाबरलेला दिसला. अचानक लोकांची गर्दी जमल्यामुळे घाबरलेल्या अब्रामला शाहरुखने अखेर उचलून घेतले. त्याचप्रमाणे देवाची पूजा कशी करावी असेही तो आपल्या या लाडक्या लेकाला सांगताना दिसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 8:54 am

Web Title: ganesh utsav 2017 photo shah rukh khan takes part in ganpati visarjan with abram suhana and gauri
Next Stories
1 ‘सुबोधसोबतचा मुंबई टू गोवा प्रवास अविस्मरणीय’
2 चित्ररंजन : आता मनोरंजनाचा पाऊस
3 नाटक-बिटक : विनोदी एकांकिकांची नाटय़प्रेमींना मेजवानी
Just Now!
X