गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. संपूर्ण देशावर करोनाचं संकट असताना आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन झालं आहे. करोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. परंतु नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
“गणपती बाप्पा मोरया” असं म्हणत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अजय गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत एक लाख ८१ हजारांपेक्षा अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.