News Flash

‘माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’, गौहर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर

वडिल रुग्णालयात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.

अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. नुकताच गौहरने केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वडिलांना अचानक रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले आहे.

गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला काही फोटो शेअर करत रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. हा फोटो शेअर करत तिने ‘कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’ असे कॅप्शन दिले होते. तर दुसरा फोटो तिने वडिलांच्या हातावर हात ठेवून शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने ‘माय लाइफलाइन’ असे म्हटले होते.

त्यानंतर गौहरने सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर कर सर्वांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तिने पती झैद दरबारचा देखील फोटो शेअर केला आहे.

गौहरने २५ डिसेंबर रोजी दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केले. त्यांच्या लग्नातीला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर गौहरने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. चित्रीकरणासाठी ती लखनऊला गेली होती. चित्रीकरण संपल्यानंतर ती झैदसोबत उदयपुरला हनीमूनसाठी गेली.

काही दिवसांपूर्वी गौहर खान ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया आणि झीशान आय्यबू मुख्य भूमिकेत होते. सीरिजमध्ये गौहरने डिंपलच्या पीएचे काम केले आहे. तसेच ती बिग बॉस १४मध्ये सीनियर कंटेस्टंट म्हणून देखील दोन आठवडे बिग बॉसच्या घरात दिसत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 3:14 pm

Web Title: gauahar khan father was admitted to the hospital actress share post avb 95
Next Stories
1 ‘दसवी’मध्ये अभिषेकचा थाट, गंगारामचा रुबाब तर पहा!
2 ‘स्कॅम 1992’ नंतर आता ‘स्कॅम 2003…’
3 ‘त्याला श्रद्धाशी लग्न करायचे असेल तर…’, रोहन श्रेष्ठाच्या वडिलांचा खुलासा
Just Now!
X