२०२० या वर्षाअखेर आणखी एक सेलिब्रिटी जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारशी येत्या २५ डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली असून गौहरने सोशल मीडियावर लग्नपत्रिकेचा अनोखा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लॉकडाउनदरम्यान गौहर आणि झैद यांच्यात प्रेम कसं फुललं, हे या व्हिडीओत अत्यंत कल्पकतेने दाखवण्यात आलं आहे.
‘जब वी मेट’ असं कॅप्शन देत गौहरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या दोघांची भेट कशी झाली आणि झैदने गौहरला कसं प्रपोज केलं, हे सर्व या व्हिडीओत पाहायला मिळतं.
View this post on Instagram
आणखी वाचा : ईशा केसकरच्या घरी सिद्धार्थ-मितालीचं पहिलं केळवण
झैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलग आहे. वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात करिअर न करता झैदने वेगळी वाट निवडली. डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 10:14 am