22 January 2021

News Flash

अरबाजसोबत लग्न कधी करणार?; जॉर्जिया म्हणाली…

अरबाजच्या गर्लफ्रेंडने दिलं थक्क करणारं उत्तर

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या काही काळापासून गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रीयानीसोबत राहात आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओज अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अगदी लॉकडाउनच्या काळातही दोघे एकत्र राहात आहेत. या फोटोंमुळे दोघं लग्न कधी करणार हा प्रश्न वारंवार विचारला जातो. हाच प्रश्न नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जॉर्जियाला विचारण्यात आला. या प्रश्नावर तिने थक्क करणारे उत्तर दिले.

सर्वाधिक वाचकपसंती – “विशाखापट्टणम वायू गळतीला देवच जबाबदार, कारण…”; दिग्दर्शकाचे ट्विट

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली, “लोकांना वाट्टेल तो विचार करु देत आम्हाला फरक पडत नाही. लग्नाचा विचार आम्ही अद्याप केलेला नाही. परंतु जेव्हा लग्न करु तेव्हा सर्वांनाच कळेल.”

सर्वाधिक वाचकपसंती – “होय, मी लॉकडाउनमध्ये केलं शुटींग, तुम्हाला काही अडचण आहे का?”; बच्चन संतापले

 

View this post on Instagram

 

Being a barber or being barbaric!? What say? #Quarantine #Mood #Fun #BoredInTheHouse

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22) on

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान लवकरच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र नांदत होती. गेल्यावर्षी अरबाजनं पत्नी मलायकाशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी एकमेकांना डेट करू लागले. अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसले. आता हे दोघं २०२१ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याला खान कुटुंबानं मान्यता दिली असल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 4:12 pm

Web Title: georgia andriani dismisses rumoured wedding plans with arbaaz khan mppg 94
Next Stories
1 सागर कारंडेशी थेट संवाद साधण्याची संधी
2 ‘लवकरच महायुद्ध होण्याची शक्यता आहे…’ अभिनेत्याने खळबळजनक ट्विट
3 “लवकरच महायुद्ध सुरु होणार”; अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य
Just Now!
X