कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून या मालिकेमध्ये आता कियाराचं सत्य अक्षय आणि अमृतासमोर येणार आहे. घाडगे सदनमध्ये अक्काच्या येण्यामुळे अमृता आणि अक्षयला पुन्हा एकदा नवरा-बायकोप्रमाणे वावरावं लागत आहे. अक्षय आणि कियाराने लग्न केल्याचं अक्काला माहित नाही. त्यामुळे त्या अमृतालाच अक्षयची बायको मानत आहेत. त्यातच कियारा गरोदर असल्याचं तिने खोटं सांगितलं आहे. तिचं हेच सत्य लवकरच उघड होणार आहे.
इतके वर्ष जोडून ठेवलेले कुटुंब अचानक तुटलं त्यामुळेच माई आणि अण्णाच खचून जाणं, कियारा गरोदर असणे. या सगळ्यातच मालिकेमध्ये आता एक वेगळे वळण येणार आहे. कियारा गरोदर नाही याची खात्री अक्कांना पटली असून अक्का हे सत्य आता अक्षयला सांगणार आहेत. त्यामुळे कियाराचं हे सत्य लवकरच अक्षयच्या समोर येणार आहे.
कियारा गरोदर असल्यामुळे सगळं घाडगे कुटुंब खुश आहे. परंतु ती गरोदर नसल्याची शंका अक्कांना सुरुवातीपासूनच होती. कियाराच वागण-बोलण, घरात वावरण या सगळ्या गोष्टी पाहता ती गरोदर नसल्याचं दिसून येत होतं. त्यातच अक्का कियाराच्या पोटाला हात लावायला जात असताना कियारा तेथून पळ काढते. तिच्या याच गोष्टीमुळे कियारा गरोदर नसल्यावर अक्कांचा विश्वास बसतो. त्यामुळे त्या ही गोष्ट अक्षय आणि अमृताला सांगणार आहेत.
आता ही बातमी अक्षयला सांगितल्यावर अक्षय काय करेल ? घरच्यांना हे सत्य अक्षय कधी आणि कस सांगेल ? घाडगे कुटुंब आणि विशेषत: माई यावर काय म्हणतील ? कियारा घरात परतली आहे आता अमृताचं अस्तित्व घाडगे परिवारात काय असेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 4:32 pm