News Flash

ठिकाण बघून कपडे ठरवा- उर्मिला कोठारे

तोकडे कपडे घालण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही

अभिनेत्री उर्मिला कोठारे

बंगळुरुमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडलेल्या महिला आणि तरुणींसोबत गर्दीचा फायदा घेत मद्यधूंद अवस्थेत फिरणाऱ्या टवाळखोरांनी असभ्य वर्तन केल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर पूर्व बंगळुरुमधील कम्मनहालीमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी एका महिलेचा विनयभंग केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या घटनेची सर्व स्थरावर निंदा करण्यात आली होती. बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल तिखट प्रतिक्रिया मांडल्या होत्या.

मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि क्रांती रेडकर यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुलींच्या छोट्या कपड्यांबद्दल त्यांच्यावर बोट ठेवले जात होते याबद्दल लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये बोलताना उर्मिलाने यावेळी आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, बंगळुरुमध्ये जी घटना झाली त्यात मुलीने तोकडे कपडे घातले नव्हते. मुला मुलींना लहानपणापासूनच अशा पद्धतीने वाढवलं जातं मुलं मुली वेगवेगळ्या शाळेत शिकतात त्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना एकमेकांबद्दल अधिक कुतुहल वाटायला लागतं. यासाठी लहानपणापासूनच मुला-मुलींना एकमेकांसोबत बोलायला खेळायला दिलं तर ते कुतुहल कमी होतं.

तसंच तोकडे कपडे घालण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही तोकडे कपडे घालता तेव्हा ते कुठे घालता याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या परिसरात असे कपडे वापरता, तिथल्या लोकांची तुम्हाला छोट्या कपड्यात स्वीकारण्याची मानसिकता आहे का याचाही विचार करणे आवश्यक आहे.

दरम्यान, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना क्रांती आणि उर्मिला मोकळेपणाने गप्पा मारत होत्या. यावेळी प्रेक्षकांनी उर्मिलाला महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेविषयीसुद्धा प्रश्न विचारले. महेश कोठारेंना आपण प्रेरणास्त्रोत मानत असून त्यांच्या दांडग्या अनुभवाविषयीसुद्धा उर्मिला यावेळी बोलली. क्रांती रेडकरनेही गप्पांच्या ओघात तिच्या हॉलिवूड प्रवासाविषयी सांगत तिथे चित्रपटांची तयारी कशी होते, तालिम कशा प्रकारे घेतल्या जातात याविषयीही चर्चा केली. प्रेक्षकांनीसुद्धा या दोन्ही अभिनेत्रींवर काही धम्माल प्रश्नांचीही बरसात केली. त्याचपैकी एकाने क्रांतीला तिच्या नकला करण्याच्या स्वभावावरुन अभिनेत्री श्रीदेवीची नक्कल करण्यास सांगितले. क्रांतीनेही फार आढेवेढे न घेता श्रीदेवीची अगदी हुबेहूब नक्कल केली. क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांनी मोठ्या उत्साहात प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देत फेसबुक लाइव्ह चॅटदरम्यान एकच धम्माल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 5:08 pm

Web Title: girls should select their clothes accordingly the place urmila kothare
Next Stories
1 अनिल कपूरच्या ‘डान्स’वर बक्षीस जिंकण्याचा ‘चान्स’
2 ‘करार’बद्ध क्रांती-उर्मिलाने साधला लाइव्ह संवाद
3 डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा संताप अनुष्काला भावला
Just Now!
X