News Flash

दोन महाकाय राक्षस एकमेकांना भिडणार…भारतात!

येत्या २४ मार्चला भारतात पाहायला मिळणार ही लढत

हॉलीवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय राक्षस…..तुम्ही ओळखलंच असेल कोण ते? हे राक्षस आहेत गॉडझिला आणि किंग काँग! बऱ्याच जणांनी यांना पाहिलं असेल, पण वेगवेगळं. आता हे दोघे एकत्र येऊन धुमाकूळ घालणार आहेत.

भारतातल्या वॉर्नर ब्रोज पिक्चर्सने सांगितलं की, या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता या चित्रपटाला प्रेक्षक खूप गर्दी करतील असं वाटत आहे. आम्हाला हे जाहीर करण्यास आनंद होत आहे की, गॉडझिला व्हर्सेस किंगकाँग हा चित्रपट ठरलेल्या दिवसाच्या २ दिवस आधीच भारतात प्रदर्शित होणार आहे, जेणेकरून भारतीय प्रेक्षक ह्या चित्रपटाचा अनुभव घेऊ शकतील.

ऍडम विन्गार्डने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दोन पौराणिक पात्र गॉडझिला आणि किंगकाँग हे दोघे एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. याबद्दल बोलताना विन्गार्ड म्हणतात, “१९६२ सालापासून हे युद्ध छेडलं गेलं नव्हतं. त्यामुळे हा चित्रपट करताना आम्हाला खूप चांगलं वाटत होतं. आता प्रत्येकाला आपापलं आवडतं पात्र पाहायला मिळणार आणि या दोघांचेही चाहते खूश राहतील असाच आमचा प्रयत्न आहे. या दोघांकडेही काही शक्ती आहेत आणि काही वीकपाँईट्स आहेत या दोन्ही गोष्टींचा विचार केला आहे. आमच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे कारण ही लढाई खूप महत्त्वाची आणि अनोखी असणार आहे.”

या चित्रपटात ऍलेक्झँडर स्कार्सगार्ड, मिली बॉबी ब्राऊन, रिबेका हॉल, ब्रायन टायरी हेनरी, इजा गोन्झालेज, ज्युलियन डेनिसन, केल शिंडलर आणि डिमियन विचिन हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. गॉडझिला व्हर्सेस काँग हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये भारतभर येत्या 24 मार्चला रिलीज होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 7:15 pm

Web Title: godzilla vs kong new releasing movie warner bros india vsk 98
Next Stories
1 कंगनाची टिवटिव थांबेचिना, वाद, चर्चा संपेचिनात!!!
2 २०० कोटी रुपये बजेट असणाऱ्या चित्रपटात आलियाच्या जागी उर्वशीची वर्णी
3 मानसी नाईकचा रोमँटिक अंदाज, नवा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित
Just Now!
X