विनोदवीर अजीज अन्सारीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर शेवटी आपले मौन सोडले आहे. वर्षभरापूर्वीच घडलेल्या त्या घटनेनंतर आपण त्या महिलेची माफी मागितली होती, असे अजीजने स्पष्ट केले आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात आपली छाप पाडल्यानंतर चर्चेत असणाऱ्या अजीज अन्सारीवर एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. त्याच्या वाट्याला आलेल्या यशानंतर अशा प्रकारच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आलेला अजीजने आपण, त्या महिलेसोबत तिच्याच सहमतीने रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता स्पष्ट केले आहे.

डेटवर गेले असताना अजीजने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका तरुणीने त्याच्यावर लावला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेल्या त्या २३ वर्षीय तरुणीने Babe.net या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अजीजला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच तिने त्याच्यावर आपले लैंगिक शोषण करण्याचा आरोपही केला. डेटनंतर अजीजने आपल्याशी गैरवर्तन करत, लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला. डेटनंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्या तरुणीने अजीजला ही गोष्ट बोलूनही दाखवली असल्याचे समोर आले आहे.

अजीजवर करण्यात आलेल्या या आरोपानंतर त्याच्याच प्रतिक्रियेकडे कलाविश्वातील अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. त्याविषयीच अखेर अजीजने माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडत काही गोष्टींचा खुलासा केला. ‘गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी तिला भेटलो होते. त्याचवेळी आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले. गप्पा आणि चॅट केल्यानंतर आम्ही डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. डिनर डेटनंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. अर्थात ते सर्व दोघांच्याही सहमतीनेच झाले होते. पण, त्या रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी त्या महिलेचा मला मेसेज आला ज्यात तिने आदल्या रात्री झालेल्या त्या प्रसंगाबद्दल संकोचलेपणा व्यक्त केला होता’, असे तो ‘यूएसए टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. किंबहुना तिचा संकोचलेपणा पाहून आपण व्यक्तीगतपणे ती परिस्थिती सावरुन नेण्याचे प्रयत्न केल्याचेही अन्सारीने सांगितले.

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

दरम्यान, काही दिसांपूर्वीच भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात अजीज अन्सारीला म्युझिकल कॉमेडी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. टेलिव्हिजन सीरिज ‘द मास्टर ऑफ नन’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्याचा गौरव करण्यात आला. हा अजीजचा सर्वात पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार ठरला आहे.