01 June 2020

News Flash

‘मुन्नाभाई’च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका

'लगान'मधील गौरी आणि 'मुन्नाभाई'मधील चिंकी या भूमिका साकारत ग्रेसीने प्रेक्षकांची मनं जिंकली

‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ तुफान लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ग्रेसी सिंग साऱ्यांनाच लक्षात असेल. ‘लगान’मधील गौरी आणि ‘मुन्नाभाई’मधील चिंकी या भूमिका साकारत ‘ग्रेसी’ने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र या चित्रपटांनंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र आता ती पुन्हा कलाविश्वात सक्रिय होणार असून एका मालिकेच्या माध्यमातून ती कमबॅक करणार आहे. ग्रेसी लवकरच ‘संतोषी माँ-सुनाए व्रत कथाएं’ या मालिकेतून कलाविश्वात पुनरागमन करणार असून या मालिकेमध्ये ती संतोषी माँ ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

“मी यापूर्वीही संतोषी मातेची भूमिका साकारली आहे आणि त्यानंतर आता पुन्हाच तिच भूमिका वठविण्याची संधी मिळणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हे एका स्वप्नाप्रमाणे भासत आहे. कोणत्याही देवी-देवतांच्या भूमिका साकारणं सोपी गोष्ट नसते. मात्र या भूमिकांमध्ये खूप सकारात्मकता असते”, असं ग्रेसीने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

She promised to return. I welcome and embrace her again.. . #santoshimaa

A post shared by Gracy Singh (@iamgracysingh) on

दरम्यान, ग्रेसीची ही मालिका लवकरच प्रसारित होणार असून पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ग्रेसी गेल्या काही काळापासून कलाविश्वात सक्रिय नव्हती मात्र तिचा सामाजिक क्षेत्रामध्ये मोठा सहभाग असतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 11:17 am

Web Title: gracy singh to be back as goddess on screen ssj 93
Next Stories
1 …अखेरच्या क्षणी मोडलं सलमानचं लग्न; साजिदनं सांगितला घडलेला प्रसंग
2 Video : खऱ्या आयुष्यात ‘या’ दोन व्यक्तींना ट्रिपल सीट न्यायला आवडेल- अंकुश चौधरी
3 Happy Birthday Prabhas: संपत्तीच्या बाबतीतही प्रभास ‘बाहुबली’! आहे इतक्या कोटींच्या मालक
Just Now!
X