‘कॉकटेल’ या चित्रपटात साध्याभोळ्या मीराची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे डायना पेन्टी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड होत आहे. अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फोटो आणि व्हिडीओज शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहणारी डायना यावेळी चांगलीच ट्रोल झाली आहे. डायनाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोल व्हावं लागत आहे. परंतु, डायनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं नसून चक्क बॉलिवूडमधील काही कलाकारांनीच ट्रोल केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर डायनाच्या या फोटोची आणि बॉलिवूड कलाकारांच्या कमेंटची चर्चा होत आहे.

साधारणपणे कोणत्याही कलाकारने सोशल मीडियावर त्याचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांकडून चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट मिळतात. मात्र पहिल्यांदाच असं झालं आहे की, बॉलिवूड कलाकारांनीच एका बॉलिवूड अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. यामध्ये दिया मिर्झा, सोनू सूद, अदिती राव हैदरी आणि पुनीत मल्होत्रा यांनी डायनाला ट्रोल केलं आहे.

काही दिवसापूर्वी डायनाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटो शेअर करत “विस्कटलेले केस, पण पर्वा नाही कुणाची”, असं कॅप्शन दिलं होतं. हे कॅप्शन देत डायना तिचे केस सावरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मुळातच तिचे केस नीट विंचरल्यासारखे होते. त्यामुळेच बॉलिवूड सेलेब्सने तिला ट्रोल केलं.

‘डी…असे विस्कटलेले केस अनेकांचं स्वप्न आहे’, असं अदिती राव हैदरीने कमेंट केली. तर ‘उह.. विस्कटलेले केस कुठे आहेत?’, असं दियाने म्हटलं.

दिया आणि आदितीप्रमाणेच सोनू सूद आणि पुनीत मल्होत्रानेही कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. ‘विस्कटलेले केस, थेट पार्लरमधून आली आहेस’, असं सोनू सूद म्हणाला. तर ‘हे विस्कटलेले केस आहेत?’, असं पुनीत मल्होत्रा म्हणाला.

 

View this post on Instagram

 

Messy hair, don’t care!

A post shared by Diana Penty (@dianapenty) on

दरम्यान, डायनाने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या कमेंटवर अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही. सध्या डायना तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं नाव शिद्दत असं असून या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सनी कौसल, राधिका मदान आणि मोहित रैना ही कलाकार मंडळ स्क्रीन शेअर करणार आहेत.