News Flash

VIDEO: ‘काला चष्मा’चे गुजराती व्हर्जन व्हायरल

'काला चष्मा' नेटिझन्सची पसंती मिळवत अनेकांना त्यावर ताल धरायला भाग पाडत आहे

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आगामी ‘बार बार देखो’ या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटाचे ‘काला चष्मा’ गाणे प्रचंड गाजत असतानाच, आता या गाण्याला एका चाहत्याने गुजराती भाषेचा साज चढवला आहे. ‘बार बार देखो’चा ट्रेलर सध्या चर्चेत असताना ‘काला चष्मा’चे गुजराती व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झाला याहे. गुजराती ‘काला चष्मा’ नेटिझन्सची पसंती मिळवत अनेकांना त्यावर ताल धरायला भाग पाडत आहे.
दरम्यान, ‘बार बार देखो’ या चित्रपटातील ‘काला चष्मा’ गाण्यास रॅपर बादशाहने संगीतबद्ध केले असून त्यास अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. अमर आर्शीच्या १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चष्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. तर गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को-सिझर यांनी केली आहे. गेले कित्येक दिवस रुपेरी पडद्यापासून दूर असलेली कतरिना तिच्या आगामी ‘बार बार देखो’ या चित्रपटातील नव्या गाण्याच्या लूकसाठी ट्रेंडमध्ये आली आहे असेच म्हणावे लागेल. करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहराने केले आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नित्या मेहेरा हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोमँटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार असून ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 1:15 pm

Web Title: gujarati version of kala chashma
Next Stories
1 शाहिद कपूरच्या रुपात ‘पद्मावती’ला गवसला तिचा राजा
2 मला रशियन, चीनी आणि फ्रेंच चित्रपट करायचे आहेत- सोनम कपूर
3 सदाबहार किशोर कुमार…
Just Now!
X