27 February 2021

News Flash

Hacked trailer: पहिल्याच चित्रपटात हिना खान देणार हॉट सीन्स

'बिग बॉस' फेम हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

‘बिग बॉस’ फेम हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मादक आदा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा गाजवणारी हिना आता लवकरच बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिचा ‘हॅक्ड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला असुन त्यात हिना आपल्या बोल्ड अवतारात दिसत आहे.

‘हॅक्ड’ हा एक सायबर क्राईमवर आधारित असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक १९ वर्षांचा मुलगा दाखवण्यात आला आहे. त्याला हिनासोबत लग्न करायचे आहे. परंतु त्याचे वय लहान असल्यामुळे ती त्याचा प्रस्ताव धुडकाऊन लावते. त्यानंतर तिचा होकार मिळवण्यासाठी तो तिला विविध प्रकारे त्रास देण्यास सुरुवात करतो. तो हिनाचे फोन, कंप्यूटर, सोशल मीडिया अकाऊंट्स सर्व काही हॅक करतो. आणि त्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो.

या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन विक्रम भट यांनी केले आहे. येत्या सात फ्रेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 2:54 pm

Web Title: hacked trailer hina khan rohan shah vikram bhatt mppg 94
Next Stories
1 या अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचं कळलं तीन दिवसांनी !
2 घटस्फोटित जोडीची हटके केमिस्ट्री; ‘त्या’ एका गोष्टीमुळे वारंवार येतात एकत्र
3 पहिल्यांदाच रशियात वाजणार मराठी चित्रपटाचा डंका, ‘काळ’ होणार प्रदर्शित
Just Now!
X