28 November 2020

News Flash

“सेटवर कंगना…”, हंसल मेहता यांनी सांगितला कंगनासोबत काम करण्याचा अनुभव

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हंसल मेहता ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. पण असे काही चित्रपट आहेत ज्यांचे दिग्दर्शन करुनही हंसल मेहता आनंदी नसल्याचे पहायला मिळाले. यामधील एक चित्रपट म्हणजे ‘सिमरन.’ या चित्रपटात त्यांनी कंगनासोबत काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. दरम्यान या चित्रपटाच्या वेळी कंगना आणि त्यांच्यामध्ये वाद देखील झाल्याचे म्हटले जाते.

नुकताच हंसल मेहता यांनी एका मुलाखतीमध्ये कंगनासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘मी खोटं बोलणार नाही. सेटच्या बाहेर कंगनासोबत खूप चांगला वेळ घालवला होता. आम्ही भेटायचो, जेवायला बाहेर जायचो. कंगना नेहमी वेगवेगळे रेस्टॉरंट शोधून काढायची. आम्ही पार्टी पण एकत्र केली होती. पण चित्रपटाच्या सेटवर कंगना संपूर्ण टीमला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायची. ती सेटवर इतर कलाकारांना देखील सल्ला देत होती’ असे हंसल यांनी म्हटले.

पुढे हंसल यांनी म्हटले की सिमरन चित्रपटामुळे त्यांचा तोटा झाला होता. ‘हा चित्रपट करुन मी खूप मोठी चुक केली आहे. मी हा चित्रपट करायला नको होता. एक दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट केल्यानंतर मला मानसिक त्रास झाला होता’ असे त्यांनी पुढे म्हटले.

काही दिवसांपूर्वीच हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या सीरिजच्या कथेपासून ते प्रत्येक कलाकारच्या भूमिकेपर्यंत सर्वांच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:03 pm

Web Title: hansal mehta opens up on working with kangana ranaut on simran avb 95
Next Stories
1 “आरक्षण जातिनिहाय देऊ नका”; कंगना रणौतची सरकारकडे मागणी
2 युवराज सिंगने एक्स गर्लफ्रेंड किम शर्माच्या बिकिनी फोटोवर कमेंट करत उडवली खिल्ली
3 रावणाला दिलं ‘इंग्लिश’मध्ये आव्हान; त्या वाक्यामुळे मनोज तिवारी होतायेत ट्रोल
Just Now!
X