27 February 2021

News Flash

Happy Birthday Akshay Kumar : बॉलिवूडच्या ‘खिलाडी’बाबत काही रंजक गोष्टी

अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्यसोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी या सर्व गोष्टींमुळे अक्षयने आपला वेगळा असा एक चाहतावर्ग तयार केला आहे.

अक्षय कुमार, akshay kumar

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करून सुपरस्टार झालेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार मोडतो. अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्यसोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी या सर्व गोष्टींमुळे अक्षयने आपला वेगळा असा एक चाहतावर्ग तयार केला आहे. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..

१. लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते.
२. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले. तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले.
३. ‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते.
४. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते.
५. त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.
६. ‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.
७. भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले.
८. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे.
९. नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:26 am

Web Title: happy birthday akshay kumar some interesting facts about him
Next Stories
1 ‘जन गण मन’चे सूर कानावर पडताच ऐश्वर्याचे डोळे भरून येतात तेव्हा…
2 सोशल मीडियावर श्रद्धा आणि आलियाच्या चाहत्यांमध्ये जुंपली
3 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेचे १०० भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन
Just Now!
X