24 October 2020

News Flash

Happy Birthday Gulshan Grover : जाणून घ्या, बॉलिवूडच्या ‘बॅडमॅन’विषयी

गुलशन गोवर यांनी आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

गुलशन गोवर

कधी काळी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ‘बॅडमॅन’ अर्थात अभिनेता गुलशन गोवर साऱ्यांनाच ठाऊक असेल. १९८१ मध्ये ‘रॉकी’ या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गुलशन गोवर यांचा आज वाढदिवस.

२१ सप्टेंबर १९५५ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या गोवर यांनी आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे गुलशन यांनी ‘रॉकी’ चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले आणि पाहता पाहता ते बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
गुलशन यांच्या वाट्याला अनेक वेळा खलनायकाच्या भूमिका आल्याचं पाहायला मिळतं. मात्र या भूमिकांना त्यांनी पुरेपूर न्याय दिला. यामुळेच त्यांना बॉलिवूडमधील ‘बॅडमॅन’ हे नवं नावही मिळालं.

‘येस बॉस’, ‘मोहरा’, ‘राम लखन’, ‘राजा बाबू’, ‘सोहनी महिवाल’ यांसह अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. त्यानंतर डिज्नीच्या जंगल बुकच्या सिक्वेलमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यामुळे आज ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, गुलशन ग्रोवर यांच्या ‘बॅडमॅन’ या नावावर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली असून या चित्रपटामध्ये त्यांनी नायकाची भूमिका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 2:47 pm

Web Title: happy birthday gulshan grover
Next Stories
1 Thugs of Hindostan : भेटा ‘ठग्ज’च्या सुरैय्या जानला!
2 नील -रुक्मिणीला कन्यरत्न!
3 Sacred Games 2 : ‘इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’
Just Now!
X