11 July 2020

News Flash

‘या’ कारणामुळे सलमानचं जुहीबरोबर लग्न होता होता राहिलं

सलमानने जुहीला लग्नाची मागणीही घातली होती, मात्र...

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुही चावला. ‘इश्क’, ‘येस बॉस’,’दिवाना मस्ताना’ यासारख्या सुपरहिट चित्रपट देणारी जुही त्यावेळी तरुणाईच्या गळ्यातलं ताईत होतं. त्यामुळे तिच्यासोबत लग्न व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा होती. इतकंच काय तर बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनाही ती प्रचंड आवडायची. याच अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे सलमान खान. विशेष म्हणजे या दोघांचं लग्न होणारदेखील होतं. मात्र एका कारणामुळे त्यांचं लग्न होता होता राहिलं.

बॉलिवूडमध्ये दबंगगिरी करणारा सलमान अजूनपर्यंत अविवाहित असल्यामुळे त्याला प्रत्येक कार्यक्रमात किंवा समारंभामध्ये लग्नाविषयी विचारणा होत असते. मात्र प्रत्येक वेळी सलमान वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत सलमानच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या असून ऐश्वर्या रायबरोबरचं नातं चांगलंच गाजलं होतं. मात्र प्रत्यक्षात सलमानला एका वेगळ्याच अभिनेत्रीबरोबर लग्न करणार होता. सलमानने स्वत: एका मुलाखतीमध्ये हे मान्य केलं असून या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान एका मुलाखत देत असून त्याने या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे. तसंच त्याचं लग्न त्या अभिनेत्रीबरोबर का झालं नाही त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. अभिनयाची सुरुवात करत असताना सलमानला अभिनेत्री जुही चावला प्रचंड आवडत होती. त्यामुळे तिच्याबरोबर लग्न करावं अशी इच्छा सलमानची होती.मात्र जुहीच्या वडीलांनी नकार दिल्यामुळे सलमानचं जुहीबरोबर लग्न झालं नाही.
‘जुही ही एक चांगली मुलगी आणि गुणी अभिनेत्री आहे. त्यामुळे ती एक उत्तम सुन आणि पत्नी होऊ शकते असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी तिच्या वडीलांकडेदेखील लग्नासाठी जुहीचा हात मागितला होता.मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नव्हतो त्यामुळे त्यांना मला नकार दिला’, असं सलमानने यावेळी सांगितलं.

दरम्यान, त्या काळामध्ये जुही एक आघाडीची अभिनेत्री असल्यामुळे ती निवडक अभिनेत्यांबरोबरच काम करण्याला पसंती देत होती. यातच एका दिग्दर्शकांनी जुहीला सलमानबरोबर एका चित्रपटासाठी स्क्रिन शेअर करायला सांगितली होती.मात्र जुहीने नकार दिला होता. विशेष म्हणजे असं असूनही सलमानला तिच्याबरोबरच लग्न करायचं होतं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 9:38 am

Web Title: happy birthday juhi salman khan want marriage to juhi chawla but father not agree ssj 93
Next Stories
1 शाहरुखच्या ‘त्या’ ट्विटवर अजयने दिले उत्तर
2 ‘या’ कारणामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीत झाली हाणामारी, पाहा व्हिडीओ
3 कार्तिक-जान्हवीने प्रदूषणामुळे दिल्लीतील शूट केलं रद्द
Just Now!
X