27 January 2021

News Flash

‘या’ व्यक्तीमुळे सलमान आजही आहे अविवाहीत?

'बिग बॉस'मध्ये सलमानने केला खुलासा

सलमान खान

बॉलिवूड इंडस्ट्रीतला ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. सलमान लग्न कधी करणार आणि कोणासोबत करणार हा सर्वांच्याच औत्सुक्याचा प्रश्न आहे. बॉलिवूडच्या या ‘दबंग’ खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र एक अशी व्यक्ती आहे, जिच्यामुळे सलमान आजही अविवाहित असल्याचं म्हटलं जातं. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वात सलमानने त्या व्यक्तीचा खुलासा केला होता.

ती व्यक्ती आहे एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. रेखा यांनी त्यांच्या ‘सुपर नानी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने हा खुलासा केला होता. रेखा आणि सलमान हे दोघंही मुंबईतील बँडस्टँड परिसरात राहतात. “किशोरवयीन असताना मी मित्रांसोबत फिरल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील कट्ट्यावर झोपायचो आणि रेखा यांना मॉर्निंग वॉक करताना पाहण्यासाठी पहाटे साडेपाचला उठायचो,” असं सलमान या शोमध्ये म्हणाला होता. “त्यावेळी माझा योगसाधनेशी काहीच संबंध नव्हता. पण फक्त रेखाजी त्या क्लासमध्ये शिकायला यायच्या म्हणून मी तिथेसुद्धा जाऊ लागलो”, असंही त्याने सांगितलं होतं.

यावेळी रेखा यांनीसुद्धा सलमानशी निगडीत एक आठवण सांगितली. “सलमान जेव्हा सहा-सात वर्षांचा होता, तेव्हा मी मॉर्निंग वॉकला गेले असता तो सायकलने माझा पाठलाग करायचा. त्याला माहितीच नव्हतं की त्याच क्षणी त्याला माझ्यावर प्रेम जडलं होतं. घरी जाऊन त्याने सर्वांना सांगितलं होतं की मला त्या मुलीशी लग्न करायचं आहे,” असं त्या म्हणाल्या. त्यावर सलमानने लगेच उत्तर दिलं, “कदाचित म्हणूनच माझं अजूनही लग्न होऊ शकलं नाही.”

सलमान सध्या ‘बिग बॉस’च्या चौदाव्या पर्वाचं सूत्रसंचालन करत असून महेश मांजरेकरांच्या ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाच्या शूटिंगलाही त्याने सुरुवात केली आहे. यामध्ये सलमानसोबत आयुष शर्मासुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 9:57 am

Web Title: happy birthday salman khan did you know this actor is the reason he never got married ssv 92
Next Stories
1 पंगना राणावत म्हणत शिवसेनेनं कंगनाला डिवचले
2 ३३ वर्षांनंतर वर्षा उसगांवकर थिरकणार या गाण्यावर
3 ‘ओटीटी’वरही नाटकाची तिसरी घंटा
Just Now!
X