News Flash

Birthday Special : विकी कौशलचं शिक्षण माहितीये का?

जाणून घ्या, विकीने कोणत्या क्षेत्रातील पदवी घेतली आहे

विकी कौशल

दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक ‘,’मसान’,’संजू’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन विकीने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा मिळवली. आज या अभिनेत्याचा ३१ वा वाढदिवस. कलाविश्वात सहज वावर करणाऱ्या या अभिनेत्याच्या करिअरविषयी साऱ्यांनाच माहित आहे. परंतु या अभिनेत्याने नेमकं कोणतं शिक्षण घेतलं आहे हे फार कमी जणांना माहित आहे.

१६ मे १९८८ रोजी मुंबईतील एका चाळीत विकीचा जन्म झाला. विकीचे वडील श्याम कैशल त्यावेळी अॅक्शन डायरेक्ट होते. तर त्याची आई वीणा कौशल या गृहिणी होती. विकीला लहान असल्यापासून अभिनयाची प्रचंड आवड होती. मात्र ही आवड जपत त्याने विकीने अभियांत्रिकीचं शिक्षणदेखील पूर्ण केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Kamli won! Thank You @iifa @wizcraft_india … such a special night for so many reasons. #iifa2019

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

विकी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजीनिअर असून त्याने २००९ साली मुंबईतील राजीव गांधी इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ही पदवी संपादन केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका ठिकाणी नोकरीही केली. मात्र त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर त्याने नोकरीचा त्याग करुन कलाविश्वात पदार्पण केलं

दरम्यान, विकीने ‘मसान’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यू हा पुरस्कारही मिळाला. या चित्रपटानंतर त्याने एकाहून एक सुपरहिट चित्रपटांचा धडाका लावला. यात ‘संजू’, ‘राजी’ या चित्रपटांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. त्यानंतर त्याचा ‘उरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तर लोकप्रियतेचं शिखर गाठल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 9:35 am

Web Title: happy birthday vicky kaushal know secret facts about vicky kaushal life ssj 93
Next Stories
1 कैफ नव्हे तर ‘या’ आडनावाने ओळखली जायची कतरिना
2 सेटवर रामानंद सागर यांच्या मुला आणि नातवासोबत मालिकेतील लक्ष्मण, पाहा फोटो
3 मुलाखतीमध्ये आईचं बोलणं ऐकून रणवीर सिंगला कोसळं रडू, पाहा व्हिडीओ
Just Now!
X